नेहमी प्रमाने रविवार सकाळ (साधारण ११:४५ am ), आळस आवरत चंपक उठला , तोंड धुन बसला . त्याची नजर बंड्या कडे गेली . बंडोपंत cupboard मधली पुस्तके आवरून ठेवत होते.
चंपक ने माफक प्रश्न विचारला ” काय बंड्या, काय करतोय, चला जरा नास्ता पाणीच बघुयात ?”
बंड्या ने आपल्या नेहमीच्या पुढारी भाषेत उत्तर दिले, ” अहो चंपक राव, कधीतरी खाण्या पिण्या च्या पुढे बघा, इथे या semester ची पुस्तके शोधून arrange करून ठेहवतोये, म्हणजे आपल्याला परीक्षे ला बरे, महत्वाचा आहे,…. तर जरा तुम्ही तुमच्या पोटाला सांगा, थांब म्हणून”

तितक्यात गणू उठला होता, चंपक च्या प्रश्न आणि त्याला मिळालेले उत्तर, दोन्ही चे बोध घेत गणू ने चादर तोंडावर ओढली, आणि अजून २ तास तरी नाश्ता नशिबात नाही, तर निदान झोपून घ्यावे, कारण दोन अठवड्या पूर्वी श्री बंडोपंत यांचा गाद्या झटकुन परत ठेवण्या चा कार्यक्रम ३ तास चालला होता, आणि इथे तर पुस्तके वाचून arrange होत होती, निदान ३-४ तास चालणार हे नक्की!

राजा पण गणू चा शहाणपणा अंगी घेऊन चादर ओढू लागला

तितक्यात ग्रुप चे चावरे म्हणून ओळखले जाणारे, श्री मंगू उठले. झालेले संभाषण त्यांच्या कानावर पडले होते, आणि त्यांची tube पेटली, “बरोबर आहे बंड्या, ते exam च्या वेळी नेहमी पुस्तकांचा गोंधळ होतो, बरं झालं, तू आवरुन घे, तो पर्यंत मी तुला एक गोष्ट सांगतो, एका प्रवचनात ऐकली होती मी ”

चंपक, “पोहे, शेंगदाणे, … जाऊ दे, सांग ”

बंड्या, “वाह, प्रवचनाला जाता म्हणजे तुम्ही, वाटलं न्हवता, बोला..”

मंगू बोलू लागला,
” एक धर्मवीर म्हणून राजा होता, हुशार, धाडशी, आणि महत्वाचे म्हणजे तो महत्त्वाकांक्षी होता, आपल्या बंड्या सारखा (हरबरा चे झाड !)
त्याची एक महत्वाकांक्षा होती, आजू बाजू चे ५ राज्य त्याला जिंकून आपल्या राज्यात शामिल करणे. त्याने एक मोठे सॆन्य उभे केले, आणि पराक्रम गाजवत एका मागे एक, अशी चार राज्ये काबीज केली. त्याची नजर आता राहिलेल्या पाचव्या रितनगर राज्या वर होती. रितनगर चे सॆन्य कमजोर होते, आणि शेवटी जिंकायला सोपे अशे राज्य मुदामून धर्मवीर ने ते ठेवले होते. कारण त्याला एक ऋषी मुनी ने सांगितले होते कि आधी अवघड काम करावीत मग सोपी ”

“बरोबर आहे, चांगली शिकवण आहे” बंड्या ने interrupt केले

ignore करत मंगू continue करू लागला
” सोपे राज्य म्हणून, राजा, माफक सैन्य घेऊन निघाला. जास्त घोडे, रथ, न्हेने टाळले, त्याला लवकर पोचून आपली मंझिल साध्य करायची होती, जास्त ओझे नको, लवकर पोचू असा विचार, आणि तो निघाला. रितनगर त्याच्या हिशोबाने ३ दिवसाची मोहीम, अशी त्याची तयारी. पण रस्त्यात पिरू नदी ला पूर आला होता आणि त्याचे दोन दिवस पाणी कमी होण्याची वाट बघण्यात गेले. पाणी उतरले आणि राजा cross करून मोहीम resume केली. रितनगर च्या सीमे वर पोचल्या वर राज्य ला त्याच्या सेनापती कडून कळाले कि बरोबर आणलेली सगळी अन्न सामग्री संपली आहे, दोन दिवस ज्यादा लागल्या ने, आणलेले सर्व अन्न संपले होते. संध्याकाळ ची वेळ होती, त्या मुले रात्री तर युद्ध शक्य न्हवते, पण उद्या उपाशी पोटी सैन्य न्याचे?”

इतक्यात सगळे झोपलेले, suspense मुळे जागे होऊन बसले होते, नीट लक्ष देऊ लागले

मंगू आता form मध्ये आला होता

जो जेवण देईल त्याला अभय आहे

” त्या रात्री रितनगर च्या बाहेर सीमे वरील एका गावात सॆन्य घुसले. राजा ला खूप भूक लागली होती, त्याने आपल्या सैनिकाला धाडले, जा गावातील एका घरातून जेवण घेऊन या, त्या घराला मोबदल्यात, युद्ध मध्ये अभय देऊ असे सांगा, त्यांचे घर नष्ट करणार नाही हा शब्द द्या.
सैनिक निघाले, त्यांना एक लहान से घर दिसले, राजा ची ऑफर त्यांनी तिथल्या एका बाई ला सांगितली. मावशी, तुझ घर नीट राहील, हा वादा
ऐकून मावशी म्हणाली, थांबा मी आत जाऊन ताट भरून ठेवते, बोलवा तुमच्या राजा ला. सैनिक गेले आणि राजा ला घेऊन आले. राजा घोड्या वरून उतरला. त्याचा आवाज ऐकताच मावशी एक ताट घेऊन बाहेर अली. पण त्या ताटात जेवण न्हवते, त्यात तिनी घरातले सोने, काही मोती, तिच्या बांगड्या, चांदीची नाणे ठेवले होते.
‘हे काय आहे’ राजा दणाणला
‘धर्मवीर राजा, तू तुझे राज्य सोडून एवढ्या लांब का आलास, या सोन्या साठी च ना, उद्या तू युद्ध करणार कश्या साठी, मोती, संपत्ती वाढवावी म्हणूनच ना, मग तेच मी तुला आज देते ज्याची तुला हाव आहे ” मावशी बोलली.
ऐकून राजा थक्क झाला, आपण कश्या साठी युद्ध करतोय याचा प्रश्न त्याला पडला.. दुसऱ्या दिवशी तो आपले सैन्य घेऊन परत आपल्या घरी

सोने चांदी आणि हिरे, घ्या ताटात

गेला”

“तात्पर्य काय, जास्त हाव करू नये, Greed is not good”, बंड्या बोलला

मंगू म्हंटला “नाही, एवढ्या लांब गेला राजा, तो का परतला, कारण त्याला भूक आवरेना, त्याला कळले कुठली पण संपत्ती घेऊन त्याचे पोट भरणार न्हवते, त्याला अन्न लागते !!!”
“म्हणून म्हणतो बंडोपंत, आमच्या पोटाला पण जरा अन्न मिळू द्या, धर्मवीर ला कळले, आता आमच्या पोटा चा बघा !”

वाक्य ऐकतास पुर्ण रूमला हसू सुटले. खी खी खी खी खी झाल.

बंडू ने पुस्तके बाजूला ठेवली आणि म्हणाला, “चला आजचे पोहे माझ्या कडून”

गरमागरम पोहे
Previous Ittefaq : Juxtaposition of Coincidences
Next Bellerin : Fast but not Furious!

No Comment

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *