रविवार सकाळ, बंड्या पेपर वाचता वाचता गणू कडे वळाला आणि चालू झाला, “काय गण्या, एक नंबर बातमी आहे बघ आज”

गणूला आता पर्यंत बंडोपंत साहेबांची चांगली ओळख झाली होती त्यामुळे जास्त कुतूहल न दाखवता, निवांतपणे विचारले, “काय बातमी आहे?”

बंडूला आपला audience मिळाला हो जा शुरु, “तुला माहिती आहे का, आपल्या मार्केट यार्ड ला नवीन बस डेपो होणार आहे!”

गणू, “म्हणजे आता बसेस वाढणार, आपल्याला सोयीचे होणार!”
पण गणूला माहित होते कि बंडोपंत काही एवढ्या वर थांबणार नव्हते त्यामुळे त्याने रूम वर नुकत्याच शिरलेल्या मंगू समोर टाळीसाठी हात पुढे केला.

सवयी प्रमाणे बंडू चालू राहिला, “गणूशेठ कधीतरी लांबचा विचार करा! अहो, आता आपल्याकडे बस डेपो होणार. आत्ता पर्यंत आपण ज्या बसमध्ये बसून इकडे येतो, त्याच्या मागे काय लिहिलेले असते, शिक्का कसला असतो, माहिती आहे का?”

 

डेपोचा शिक्का

गणू , “नाही” थोडा चेहरा पाडून बोलला, ‘as expected’ आता आपल्या वाट्याला बोधकारक वाक्ये येणार, याची तयारी होती ती

बंडू, “आपण सुशिक्षित आहोत, याचा उपयोग करून घेत जा, वाचा, लक्षात ठेवा, GK, काही असते का नाही !! असुदे, तर, प्रत्येक बस मागे त्या बसच्या डेपोचा शिक्का असतो सध्या आपल्याला डेपो नाही, तर शिक्का, स्वारगेट असा असतो. डेपो झाला की शिक्का मार्केट यार्ड येणार. म्हणजे एखादी बस, मार्केटची आहे का नाही, ते आपल्याला मागच्या शिक्क्याने कळणार!
आपण कुठे हरवलो असलो, शिक्का दिसला कि लागायचं pedal मारायला, follow करा आणि न चुकता back to pavilion व्हा”

आता नुसता गणू असता तरही बात हजम पण झाली असती, पण मंगूची tube पेटली,
“पण मागून कळणार कसं, बस मार्केट वरून आली आहे की मार्केट कडे चालली आहे?”

त्या वेळी बंडोपंत चा झालेला चेहरा : त्याला पुणेरी भाषेत “Kodak moment” म्हणतात

 

Previous Reshma Shaikh Miss : Grace and Beauty
Next Tumhari Sulu: Pleasant Dosage of Vidyabalan Smiles

No Comment

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *