रात्रीचा ऐकलेला अभ्यास

History आणि Geography

“अरे समीर, आज कसा काय आलास?”, काकूंनी विचारले.

चेहऱ्यावरचे हावभाव बघितले तर कळाले नसते की नक्की प्रश्न कोणाला पडला आहे, काकूंना की समीरला!
नेहमीप्रमाने चेतनने दोन्ही पार्टीना अंधारात ठेवले होते. चेतन समीरला “तू ये” एवढेच बोलला होता आणि चेतन बोलवत आहे म्हणजे काहीतरी timepass च असणार, या हिशोबाने समीरपण आला. त्यामुळे उत्तर काय द्याचे समीरला कळेना, “काकू लॉक लावायचे राहिले” असे बोलून पटकन परत दारा बाहेर पडला. समीरचा आवाज ऐकून चेतन हातातले थालिपीठ सोडून किचन मधून धावत हॉल कडे पळाला.

आपली पोल उघड पडू नये म्हणून, चेतन पटकन बोलला, “अग आई, आम्ही दोघे अनुज कडे अभ्यासाला जाणार आहोत, म्हणून तो आला आहे”

दारा बाहेर उभा असेलेल्या समीरने ‘अभ्यास’ हा शब्द ऐकला आणि अजूनच चक्रावला, ‘अरे कसला अभ्यास, मी इकडे दप्तर पण आणले नाही!’, हा चेतन अजून काय story गडतोय ते ऐकायला समीर परत आत शिरला.

“अनुज कडे कशाला? इकडेच करा की”, काकूंनी विचारले
“नाही आम्हाला एकत्र अभ्यास करायचा आहे”, चेतन ने तत्परतेने उत्तर दिले,
“का?”, काकूंनी inquiry चालू ठेवली
“आम्ही तसे ठरवले आहे”, चेतन ने आपण कुठल्यातरी कंपनीचे CEO आहोत आणि हा माझा executive decision आहे, अशा थाटात उत्तर दिले. चेतनचा confidence (ओव्हर) बघून समीरला मजा येत होती, ‘आज हा पिटणार’, एवढ्या लांबून आलो आहे तर काहीतरी enjoy!

“काही नका ठरवू, इकडेच करा अभ्यास”, काकूंनी ह्या काहीही झाले तरी president होत्या, CEO चे proposal शिस्तीत उचलून फेकून दिले.

“अगं, अनुजकडून आम्हाला geography चा एक chapter समजून घ्यायचा आहे”, चेतनने नवीन बॉल टाकला.
“का? तुम्हाला नाही येत का?”, काकूंनी सिक्स मारला. बुद्धिबळा मध्ये याला चेक अँड mate असे म्हणतात. चेतनला पूर्णपणे कोंडीत अडकवणारा प्रश्न होता, “हो” बोललो तर मग जायची गरज काय आणि “नाही” बोललो तर शाळेत काय झोपा काढतोस का म्हणून एक दोन धपाटे बसणार होते.

पण चेतनहा हार मानणार्यातला नव्हता. चेतनने विचारपूर्वक आपला defense चालू केला, “अगं, आम्ही plan केला आहे, प्रत्येक जण एक chapter करणार आणि एकमेकांना नीट समजावणार, परीक्षेच्या हिशोबाने, अनुजला जुने पेपर मिळाले आहेत. त्याने Tropical region चा chapter एकदम पक्का केला आहे. मी Artic चा. मग एकमेकांना आम्ही ते शिकवणार, doubts क्लिअर करणार, आणि सगळ्यांचे सगळे chapter एकदम पक्के. काही टॉपिक गुंता गुंती चे आहेत, त्यात परीक्षा, त्यामुळे हा प्लॅन”

याला टेक्निकल टर्म आहे ‘information ओव्हरलोड‘, इतकी माहिती द्या की समोरचा माहिती sort करण्यातच confuse होऊन जाईल.

काकूंचे तेच झाले. एवढ्या सगळ्या माहिती मुळे थोडे confusion झाले. गोलंदाजाने एकदम पाच बॉल टाकले की नक्की मारायचा कुठला? त्यांची नजर spectator समीर कडे वळली.

समीरला कळाले कीं चेतन हुशारीने निसटला आहे आणि बंदूक आता आपल्यावर अली आहे. पण जर चेतन शेर तर समीर सव्वा शेर असे गणित आहे.

काकूंनी पहिली गोळी झाडली, “तू कुठला chapter केला आहेस मग”
समीर ने एकदम confidently उत्तर दिले “१४ वा”.

एकच घाव आणि दोन तुकडे, झटक्यात आणि मोजकेच उत्तर मिळाल्या मुळे काकूंना अजून शंका काढायला scope नव्हता. अनुजकडे जाण्यावर शिक्कामोर्तब झाला.
काकूंच्या मनात अजून काही येण्याआधी मौका घेऊन दोघं बाहेर पडली, सायकल वर बसली, नीट जा, लक्ष दे, अभ्यासच करा, routine instructions त्यांना मिळाले.

थोडे पुढे गेल्यावर चेतनने समीरची शाळा घ्याला चालू केली, “सम्या, अरे फेकताना किती confidence”,
चेतनने हे वाक्य चेहऱ्यावर अशे हावभाव आणून बोलला की जसे तो जगातला सर्वात सज्जन, कधीही थापा न टाकणारे सोज्वळ बाळ आहे

“का रे?, काय झाले?”, सम्याने पण जरा sarcastic टोनमध्ये विचारले
“अरे ढोल! आपल्याला geography मध्ये बाराच chapter आहेत, तू चौदावा काढला कुठून?”

“तिथूनच, जिथून तू अभ्यासाचा प्लॅन काढला आहेस”
हजरजवाबीला समीर एक नंबर होता. विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे नेहमी असायचे. त्यामुळे चेतनने पुढे विषय ताणला नाही

पेटपूजा ते xerox पूजा

अनुजचे घर चालत १५ मिनिटांच्या अंतरावर, दोघे सायकलस्वार निघाले. रस्त्यात आप्पाची खिचडी लागली, तिथे दोघे गेले आणि full style मध्ये खिचडी ऐवजी समोसा ऑर्डर केला. त्यानंतर भजी, उगाचच extra चटणी. भजी चिंचेच्या चटणीला लोकं टेकून टेकून चवी पूर्ती घेतात, या दोघांनी मात्र सांबर वडा घेतल्यासारखे प्लेटभर चटणी, आणि त्यात भजीला अंघोळ घालून खाल्ली. नंतर लिंबू-पाणी झाले.
समीरने पुन्हा खोचत विचारले, “अनुजला तरी सांगितले आहेस ना? नाही तर तिकडे गेल्यावर वेगळा गोंधळ!”
चेतन अल्पोपाहारात इतका गुंतला होता की त्याने फक्त मान डोलवली.
शेवटपर्येंत त्यांनी काही खिचडी ऑर्डर केली नाही. निघताना पण एक समोसा पार्सल केला. चेतनचे म्हणणे असे होते की जर अप्पाला फक्त खिचडीच विकायची असती तर त्याने फक्त खिचडीच ठेवली असती, समोसा बनवलाच नसता. त्यालाच त्याच्या खिचडी मध्ये full confidence नाहीये तर आपण कशाला दाखवायचा.

रमत जमत निघालेले दोघे तब्बल ४५ मिनिटांनी पोहचली

अनुजच्या सोसायटी मध्ये शिरतास तिथे अनुज स्वागतासाठी ready होता. एकदम गडबड गडबड करत पुढे आला आणि तावातावत बोलू लागला, “अबे किती वेळ? कुठे हरवला होता, १५ मिनटे झाली चेतनच्या घरून फोन येतोय, पोचले का नाही म्हणून!.”

 

अनुजला hyper होण्याची सवय आहे, समीर आणि चेतनला त्याच्या या वाढीव स्वभावाची सवय होती, त्यांनी कुठलेही reaction दिली नाही. शांतपणे अनुजकडे बघत राहिले.

अनुजने continue केले, “बाबा मला विचारत्येत, काय सांगू? मग मीच बोललो की xerox काढायला थांबले असतील. मी बघून येतो असे सांगून बाहेर पडलो”

दोघांची अनुजकडे येण्याची ही निदान शंभरावी वेळ असेल, पण तरी अनुज त्यांना सायकल कुठे लावायची आहे हे सांगत होता. उगाच, “अबे जरा आडवी लावला, त्या खांबाला टेकून, जास्त पुढे नको, अबे लॉक लावले का रे?”. कोणीही अनुजला चुकून पण उत्तर दिले नाही तरी अनुज चालुच होता,
पण हा उगाचचा शहाणपणा दाखवण्यात अनुजलाच भान राहिले नाही, त्याच्या पार्किंग मध्ये एकच beam होती जी एक फूट खाली होती, आणि हा पठ्ट्या बरोबर त्याच beam ला जाऊन आपटला, दनकन डोकं आपटलं.

“अरे अनुज! तू जरा जपून, डोके सांभाळ तुझे, अरे रिकाम्या गोष्टी लगेच फुटतात”, समीरने लगेच टोमणा मारला.
खी, खी, खी, खी, खी, background effects ची साथ चेतनने लगेच दिली.

अनुज मात्र रक्त निघाले की काय या चिंतेमध्ये मध्ये उगाच हाथ डोक्यावर चोळायचा आणि हाथाकडे बघत बसला. अशे त्याने ३-४ वेळा केले. “अरे घासून घासून केस घालवशील….. टकल्या” यावेळी चेतनने टोमणा मारला.

तिघे जिना चढू लागली. अनुजचे घर पार्किंग वरच पहिल्या मजल्यावर, त्यामुळे पार्टी काही क्षणातच घरात पोचली.

घरात शिरताच, बाबांनी विचारले, “का रे गर्दी होती का xerox ला?”
“हो” हे सामुहिक उत्तर तिघांनी दिले. उत्तर देताना स्वर पण जुळला असे म्हणावे लागेल.

“तुमचा आवाज आला. मी तुझ्या घरी फोन करून सांगितलं पोहचले म्हणून. पण तुम्हाला एवढा वेळ का लागला वर याला, एक मजला तर आहे?”, बाबांनी विचारले

“ते अनुजचे डोकं beamला धडकले”, चेतन ओकला, “तरी त्याला सांगत होतो लक्ष दे” असं समीरने add केले.
दोघे मित्र सवयी प्रमाणे सगळे खापर अनुजवर फोडून रिकामे झाले.
“अरे तू इथे राहतो. त्यांनी तुला नाही, तू त्यांना सांगितलं पाहिजे.” बाबांनी अनुजला टोकले

अनुज डोकं खाली ठेऊन जमिनीकडे बघत बसला. पर्याय नाही, एकीकडे बाबा आणि दुसरीकडे मित्र.
“जा आता आत, अभ्यास करा”, बाबा जरा अनुजला चिडूनच बोलले आणि तिघे एका मागून एक अनुजच्या रूम कडे गेले.

कुठला अभ्यास !

रूममध्ये शिरतास अनुज पुन्हा चालू झाला, “अबे, माझ्यावर काय ढकलता रे? तुम्ही उशीर केला, आणि बोलणी मला!”
“खाली समोसा खाण्याची घाई कोणाला होती, वर बसून पण खाल्ला असता ना?” पुन्हा समीरने अनुजची बोलती बंद केली.

अनुजने पण विषय बदलला, “चला, आता आपण history चा अभ्यास करू”
“history का geography करणार आहेस तू?” समीरने विचारले.
अनुज लगेच बोलला, “history आणि मी नाही आपण”

‘आपण’ ऐकल्यावर चेतन आणि समीर एका स्वरात खी खी खी करू लागले.

“अरे अंड्या वेडा आहेस का, अरे अभ्यासच करायचा असता तर माझ्या घरी नसतो का बसलो जाड्या ! आज रात्री काका काकू येणार आहेत. उशिरा २ ला पोहचतील. ते येई पर्यंत घरी सगळे जागे राहतील. मला काहीतरी वाचत बसावे लागेल म्हणून त्यापासून वाचण्या साठी हा plan. मस्त पैकी झोप काढण्यासाठी इकडे आलो आणि तू सांग history करू”, चेतनने संदर्भासहित स्पष्टीकरण दिले.

समीरने त्यात add केले “मी पण २ दिवस नीट झोपलेलो नाही. कालच गुरुवारी २ वाजताचा picture बघण्यासाठी जागरण झाले आहे. तू अभ्यास चालू कर, मला सांग तू किती वाजेपर्यंत अभ्यास करणार आहेस?”

“माझा विचार होता पहाटे पाच पर्यंत आपण अभ्यास करू!” अनुजचे हे उत्तर ऐकून चेतन आणि समीर convinced झाले की मगाशी डोक्यावर लागलेला मार खूपच deep इजा करून गेला आहे. दोघांनी घड्यालाकडे बघितले. आता वाजले १० आणि हा पठ्या पहाटे ५ पर्यंत जागणार! वेडा झाला कि काय.
त्याचे ambition पाहून खरे तर सम्याला हसू आले होते, तरी अनुजची अजून खेचायची म्हणून तो बोलला, “एक काम कर अनुज, पहाटे झोपताना तू मला उठव, मग मी अभ्यास करतो.”

चेतनला joke मध्ये पण अभ्यासाशी संबंध ठेवायचा नव्हता, त्यामुळे तो सम्याच्या स्वरात स्वर न मिळवता पांघरून घेऊन झोपण्याच्या तय्यारीला लागला.
सम्याने पण पटकन पांगरून घेतले आणि अनुजला परत बोलला, “बघ अनुज, उठाव काय, पण ५ च्या आधी नको उठवू नकोस….. तू नक्की जगणार आहेस ना, ५ पर्यंत, नाहीतर मी alarm लावतो”. खरे तर सम्या अनुजची खेचत होता. त्याला माहित होते, अनुज जागणे शक्यच नाही पण अनुज joke च्या पलीकडे गेला होता. त्याचा निर्धार पक्का होता. आज history चा अभ्यास करून आपण इतिहास घडवणार, हा दृढनिश्चय त्याने केला.

१० चे ११ झाले, झोपलेली दोन कारटी आता जोरजोरात घोरू लागली होती. मित्रांच्या घोरण्यामध्ये पण सूर होता आणि अनुज पण त्या सुरात डुलु लागला.

डुलत डुलत अनुज १०-१५ ओळी वाचायचा आणि मध्येच त्याला आपण काय वाचतोय त्याचा संदर्भ त्याला लागत नव्हता. मग परत १० ओळी मागे. मागे पुढे करत करत पुढच्या ३ तासात अख्खी ३ पाने वाचली!. Chapter अजून १० पानांचा. असे करत करत आपले काही होणार नाही. एक काम करू थोडी rest घेऊ आणि पहाटे परत उठू आणि फुल्ल जोश मध्ये २ Chapter संपवू अशी स्वतःचीच समजूत त्याने काढली. मोहीम पुढे ढकलून अनुज झोपण्यासाठी जागा करू लागला.

दोघांचे शांत आणि तृप्त चेहरे बघून अनुजची थोडी चीड-चीड झाली. त्यांच्या घोरण्यामुळे आपला अभ्यास झाला नाही, त्यांच्यामुळेच मगाशी बाबांची बोलणी खावी लागली आणि बघा आता कशे झोपले आहेत. या विचारांमुळे झोपेला टेकलेला त्याचा मेंदू जागा झाला, थोडक्यात आतले किडे जागृत झाले. त्याने घड्याळ बघितले, २ वाजलेले. मगाशी सम्या खूप टोमणे मारत होता, उठव पाचला, उठव पाचला

 ….. “बदला” त्याची tube पेटली.

अनुज आता वेगळ्याच mission मध्ये लागला. बाल्कनी मधून स्टूल घेऊन आला. त्या वर चढला, भिंतीवरच्या घडाळ्यात २ चे त्याने ५ केले. समीरचे आणि चेतनचे घड्याळ टेबलवर ठेवले होते, त्यांचे पण काटे फिरवले.

आणि मग जो काय जाप लावला,”‘समीर उठ, समीर उठ”
पण हे बोलताना मुद्द्दाहून चेतनला हलवत होता. दोघांचे डोळे उघडले, काय झालं काही कळेना. अनुजने character काही सोडले नाही, “अबे उठा उठा, ५ वाजले. तुम्ही बोलला होताना तुम्हाला अभ्यास करायचा आहे. उठा!”
चेतनने ignore करून पुन्हा झोपण्यासाठी कुशी बदलली पण अनुज काही थांबला नाही, दोघेही उठून बसे पर्यंत तो चालू होता. दोघांची झोपमोड झाली आहे याची खात्री झाल्यावर अनुजने पांघरून घेतले आणि स्वतः झोपला

आपण झोपण्याआधी ‘पहाटे उठव’ असे काही बोललो होतो का? हा विचार चेतन ला पडला.चेतनला झोपेत काही कळेना.

 

समीरचा पण थोडा गोंधळ उडाला होता. तो ज्या बेडवर झोपला होता तो बेड टेबलला एकदम चिटकून होता. उठून बसल्यावर टेबल समोर आला, आणि त्यावरची पुस्तके पण. समीरने instinctively त्यातले एक पुस्तक उचलले.

समीरने पुस्तक उचलेले पाहून ‘अरे हा तर अभ्यास करायला लागला!’ चेतनला काही कळेना. पण आता उठलो आहे तर bathroom ला जाऊन येऊ, असा विचार करत तो हळू हळू उठला आणि bathroom मध्ये गेला.

तो पर्यंत अनुज झोपला होता, ती २-३ पाने वाचताना त्याने भरपूर मेहनत घेतली होती, बेड वर पडल्या पडल्या झोपेने त्याला takeover केले, त्याचे घोरणे पण लगेच चालु झाले.

समीर एखादे लहान बाळ जसे एखाद्या नवीन गोष्टीकडे बघते तसे त्या पुस्तका कडे बघू लागला,
हे कुठले पुस्तक आहे? size मोठी आहे, full-scape आहे, workbook असावी….
पण हे तर भरलेले आहे, आतापर्यंत सगळ्या workbooks रिकाम्या असतात आणि त्या रिकाम्याच राहतात. पण या पुस्तकात बरेच words type केलेले आहेत!
textbook दिसतंय, पण कुठलं असेल?
textbook साधारण आकाराने लहान असतात,notebook च्या size सारखी
मोठी बुक एक तर drawing ची किंवा geography असते.
किंवा ही अनुजच्या मोठ्या भावाचे पुस्तक असेल. पण अनुजच्या मोठ्या भावाला तर अणूजवर बिलकुल भरोसा नाही. अनुज कधी चहा, कधी पाणी सांडेल काही भरोसा नाही. अनुजचा भाऊ त्याची पुस्तके अशी अनुजच्या टेबल वर ठेवणार नाही.
मग ठरलेतर हे geographyचे पुस्तक आहे!

parallel-ly, चेतनचे झोपेत बाथरूम मध्ये प्रयोग चालू होते.

नळाला पाणी कसे येणार?

‘या अंड्याला पण लई हौस! साधे गोल गोल फिरणारे नळ लावायचे, हे लिव्हर कसले आहे’, ओढलं तरी पाणी नाही

हे button कसले आहे, ओढून बघू आणि picture मध्ये दाखवतात तसा शॉवर चालू झाला, आणि बंड्या च्या डोक्यावर पाणी!!
झोप उडाली, कसे बसे त्याने बटण बंद केले. भिजता भिजता वाचला, थोडे शर्ट वर, तोंडावर आणि पायावर पाणी उडले होते, main म्हणजे, पॅन्ट ओली झाली नव्हती!

_____

टाप टाप टाप

चेतनचा हा गोंधळ संपला, समीर पण पुस्तकात हे कसले drawing आहे? या विचारात मग्न झाला. अजून पण तो sure नव्हता की हे goegraphy चे पुस्तक आहे. अनुज पण deep sleep मध्ये गेला होता. वातावरण पुन्हा शांत झाले. तितक्यात त्या शांत रात्री, एखाद्या हिंदी horror सिनेमा मध्ये bagground इफेक्टला वापरतात असा ‘टाप टाप टाप’ आवाज आला.
कोणीतरी चालत चालत रूम कडे येत होते. दोन्ही गडी जरा अजूनही झोपेत होते, त्यांना काय करावे कळेना. चेतन तसाच बाथरूम मध्ये आवाज ऐकत बसला, कसलीही reaction न देता, आणि समीर त्या पुस्तकांच्या रहस्यात इतका मग्न होता की त्याला बहुतेक आवाज आलाच नाही.

चेतनने bathroom ला जाताना रूम लॉक केली नव्हती केली. त्यामुळे एक धक्का आणि बाबा आत !!

समोरच समीर पुस्तकाकडे एकटक बघताना दिसला आणि instantly, “वाह, अभ्यास जोरात चालला आहे, शाब्बास पोरा, कुठला अभ्यास करतोयस बाळा”

“geography” instant उत्तर समीरने एकदम सवयीच्या confidence मध्ये दिले

बाबानी विचारले,”काय वाचतोयस geography मध्ये?”

समीर पुन्हा confidence मध्ये बोलला, “१४ वा chapter!”

चेतनने bathroom मध्ये १४वा chapter ऐकले आणि त्याची तारांबळ उडाली.

अजून काही विपरीत घडण्या अगोदर पटकन बाहेर पडावे असा विचार करत पटापट तोंड हात पाय पुसून बाहेर पडला.
क्षणात तो बाबांच्या मागोमाग रूम मध्ये शिरला.
चेतनला बघून बाबा थोडे शॉक मध्ये गेले, एवढा वेळ त्यांना वाटत होते की अनुज bathroom मध्ये आहे, पण बाहेर तर चेतन पडला!.

“अनुज कुठे आहे?” बाबांनी लगेच विचारले.

समीर आणि चेतनने मराठी serial च्या अभिनेत्यासारखे एकदम slow motion, फुल्ल dramatic पणे मान वळवत पांघरुणा कडे बघितले, त्यावेळी रात्रीची शांतता असूनही serial सारखे ‘dhissch’ आवाज येत आहे, असे feeling आले.

समीर एकदम शांत आणि निरागसपणे बोलला, “अनुजना….. तो झोपला”

उत्तर ऐकून बाबांची तळपायातली आग मस्तकात गेली. त्यांनी चेतनकडे बघितले, थोडासा tone सावरत विचारले, “तू कुठे होतास?”

चेतन कितीही झोपेत असो, पण आग लागली आहे हे त्याला कळते आणि त्या आगेतून स्वतःला कसे वाचवायचे हे ही माहित होते. आत्ताच उठलो, असे बोललो तर आग आपल्यावर येईल. चेतनने म्हणूनच एकदम style मध्ये तोंड पुसत उत्तर दिले, “झोप लागायला लागली होती, म्हणून bathroom मध्ये होतो, तोंड धुऊन झोप घालवायला गेलो, आज geography संपवायचा आहे ना!”

हे उत्तर bomb च्या वातीला जाळणारी अगरबत्ती कशी एक छोटीशी लाल टिळा लावते तसे होते. चेतनने वात पेटवली आणि सुतळी बॉम्ब पासून लांब गेला, समीरच्या शेजारी जाऊन उगाचच एक पुस्तक उचलले

स्फोट होणारच होता आणि तो झाला. “अनुज उठ” इतक्या जोरात बोलल्या गेले की अख्ख्या सोसायटीमधले अनुज, अनिकेत, अनिवेश, अ आणि न नावात असलेले सगळे जागे झाले असतील!

अनुज ताडकण उठला आणि एका motion मध्ये उभा राहिला. समोरच संतापलेले बाबा, बाजूला समीर आणि चेतन हातात एक एक पुस्तक घेऊन. त्यात चेतनने तर पुस्तक पण उलटे धरलेले होते.

बाबा पुढे काही बोलले नाही, वळाले आणि hall मध्ये जाऊन बसले.

काही बोलले नव्हते तरी पार्टीला कळले की follow करायचे होते.

अनुजच्या मागे समीर आणि समीरच्या मागे चेतन, एक एक करून सगळे hall मध्ये पोचले. अनुज एकटा बाबांसमोर जाऊन उभा राहिला, चेतन हॉलच्या दरवाज्याला धरून थांबला आणि समीरला पण जवळ ओढले.

अनुज ला काय झालं आहे हे कळले नाही. पण बाबा ओरडले आहेत, म्हणजे आपण कुठे तरी कशी घातली आहे, असे समजून तो मान खाली घालून त्यांच्यासमोर उभा राहिला.

“काय चालले आहे. तो समीर बघ स्वतःच्या घरी अभ्यास होणार नाही म्हणून तो इकडे येऊन अभ्यास करतोय आणि तू झोपा काढ! लाज लज्जा शरम, काही नाही का?”

“अहो बाबा, मी आत्ताच झोपलो. हे झोपले होते मी एकटा अभ्यास करत होतो”, गुन्हेगाराने विनवणी चालू केली.

“मग मी काय बघितलं अनुज? चेतन मला एरवी relax करणारा वाटतो. तो झोप येऊ नये म्हणून तोंड धुतोय आणि तू झोपा काढ! रात्र भर अभ्यास करणार म्हणे! किती वाजता झोपलास तु?”

आता हे सगळे बोलताना बाबांचे बोट चेतनकडे होते, त्यात अनुज पण आश्चर्याने चेतनकडे बघू लागला. ‘हा अभ्यासाठी तोंड धूत होता! चेहऱ्या वर पाणी तर आहे, पण हे कसे काय शक्य आहे!’
पण लांब लपून बसल्या मुळे चेतनला नीट ऐकू येत नव्हते, त्यामुळे त्याला प्रश्न पडला अनुज आणि बाबा आपल्याकडे का बघतायेत?
चेतनने समीरला विचारले (हळू आवाजात), “ते आपल्याला बोलतायत का अनुजला? काही कळत नाहीये, लैच जोरात बोलतायत. ए सम्या तुला कळतंय का? ते आत्ता माझंही नाव घेत होते का रे?”

समीर मात्र एकटक बाबांकडे आणि त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत होता. त्याला अंदाज आला होता की कुठल्या पण क्षणि आग आपल्याकडे येऊ शकते. Fire extinguisher म्हणून तो ते मगासचे पुस्तक घेऊनच आला होता. चेतनचे प्रश्न त्याला distract करत होते. पण आगेत पडणार कोण, आपण की मित्र? अर्थातच वेळ अली तर मित्रालाच ढकलावे लागेल. चेतन जितक्या अंधारात राहील तितके बरे, ढकलताना सोपे जाईल! म्हणून समीरने चेतनचे सगळे प्रश्न इग्नोर केले.

बाबांनी आपल्या watch कडे बघत विचारले, “आता वाजलेत २:३०, तू कधी झोपलास?”

अनुजने स्वतःचा defense चालू केला, “आता २:२० ला, मीच यांना उठवून झोपलो”

बाबांनी समीरकडे बघितले, तिघांच्यात समीरचा stock वाढलेला होता. अनुजचा already डाउन होता आणि आता तर negative झाला. चेतनने आज कितीही आव आणला तरी इतिहास त्याच्या विरुद्ध होता. समीर, त्याच्या हातामधले पुस्तक, त्याचा sincere चेहरा, श्रावण बाळ!
perception आणि reality मध्ये किती अंतर असते, याचा नमुना म्हणजे समीर. बघितलं तर हा पठ्या बॅग पण न घेता आला होता, अभ्यास तर लांब, मगाशी उचललेले पुस्तक हे गेल्या वर्षीचे आहे हे पण त्याला माहित नव्हते तरी हातामध्ये मिरवत तो हॉलमध्ये उभा होता!

बाबांनी त्या समीर बाळाला एकदम हळुवार पणे विचारले, “समीर खरा सांग बाळा, तुझा मित्र आहे म्हणून खोट नको बोलू. खरा सांग हा अभ्यास करत होता का नाही?”

पण समीरच्या मागे लपलेल्या चेतनची वेगळीच धांदल उडाली होती. ‘२:३० कशे काय वाजले, आपण तर ५ ला उठलो, माझ्या घड्याळात तर ५:१५ वाजले होते’. एकतर आपण time travel केला आहे किंवा आपण स्वप्न बघतोय, असे चेतनला वाटू लागले.
त्याच्या शंकांचे निरसन करणारा एकाच तिथे होता, समीर, (एकदम हळू आवाजात), “सम्या किती वाजले, माझ्या घड्याळात ५:१५, तुझ्या किती?”

समीरकडे कसले आले घड्याळ, उठल्यापासून फक्त एकाच पुस्तक बघितले होते त्याने, आणि तेच घेऊन मिरवत होता तो. त्याचे घड्याळ तसेच टेबलवर पडले होते. समीर त्यामुळे पूर्णपणे चेतनला ignore करत होता.
आपल्या शंकांचे निरसन होत नसल्या मुळे चेतन impatient होत चालला होता, दुसरीकडे बाबांची गंभीरता वाढत होती आणि दोघांमध्ये अडकलेला समीर.

बाबांनी प्रश्न repeat केला, या वेळी tone मधला softness कमी झाला होता, “बघ समीर, बाळा (जरा जोरात होतं यावेळीच बाळा), तुझ्या मित्राकडे बघून उत्तर देऊ नकोस….. आणि चेतन त्याला prompt नको करुस मित्राची बाजू घ्यायला”
अनुज पण खुप उत्सुकतेने समीर कडे बघत होता. चेतनच्या डोक्यात तितक्यात विचार आला की हॉल मधल्या घड्याळात किती वाजले आहेत ते बघू म्हणजे कळेल माजरा काय आहे. तो दरवाज्यातून वाकून घड्याळाकडे बघायला गेला, पण समीरच्या पुढे जाऊन बाबांना face करायची हिम्मत काही नव्हती त्यामुळे जागेवरच वाकून बघायला गेला. आता होणार काय? बंड्या आधीच भिजलेला, पाय ओले, त्यात वाकडे तिकडे वाकणे, पाय सटकला, तोल गेला आणि चेतन फरशीवर आडवा!

समीरने त्याला उचलले आणि बाबांपासून cover म्हणून स्वतः समोर उभे केले. अनुज पण सरकला होता चेतनला उचलायला पण समीरने वेळ न घालवता स्वतःला safe केले.
बाबांनी पण विचारपूस केली, “ठीक आहेस ना? कुठे लागले तर नाही?”
चेतन आता हॉलच्या आत बाबांसमोर होता, टरकली होती, फुटफुटत बोलला, “नाही काका, काही नाही, पाय ओला, सटकला”
बाबा परत main मुद्द्याकडे वळले, “तर अनुज, अशी अपेक्षा नव्हती तुझ्या कडून.”
अनुजला झेपले नाही, आपला गुन्हा कधी सिद्ध झाला! समीर काही बोलला नाही तरी कसाकाय? तो लगेच बोलला, “अहो बाबा, मी खरंच करत होतो अभ्यास”

बाबांनी काही विश्वास बसेना, त्यांनी विचारले, “हो का, सांग मग कसला अभ्यास केला?”
अनुजने एका आवाजात सांगितले, “history”
बाबा चेतनकडे वळले, “चेतन तू कसला अभ्यास करत होतास? आणि समीर तू अजिबात सांगू नकोस”
चेतन बाबांच्या समोरच होता, पण एकंदरीत त्याला अंदाज आला होता कीं समीरचे पारडे जड आहे, अनुज की समीर, history का geography आणि चेतनने correct उत्तर दिले, “geography!”
बाबांनी पुढे विचारले, “कुठपर्यंत आला होता अभ्यास?”
चेतन बोलला, “१४वा chapter!!”
अनुजला काही कळेना, geography मध्ये १४वा chapter आला कुठून, “अबे, काहीही काय .. ”

अनुजच्या तोंडातले ‘अबे’ बाबांच्या मस्तकात गेले, “अनुज! बोलण्याची काही पद्धत! एकतर खोटे बोलतोयस आणि हा वरचढ पणा कुठला!”

बाबा उठून उभे राहिले, समीर आणि चेतनला एकदम फायनल विचारले, “खरं सांगा हा तुमच्या बरोबर अभ्यास करत होता की नाही?”

दोघांनीही कळाले कीं हाच तो क्षण, हिच ती वेळ, ज्यावेळी मित्राला ढकलून स्वतःला वाचवायचे असते. “नाही काका!” दोघेही एका स्वरात बोलले.

“मग कधी झोपला हा?” बाबांनी continue केले. समीर शांतपणे बोलला, “अडीच तासा पूर्वी”. चेतनने पण मान डोलावली. दोघे एकदम sync मध्ये एक पाऊल मागे सरकले. बाबांना हात मोकळे करायला जागा!
sannnn आवाज आला.
आवाज ऐकून काकू पण हॉल मध्ये आल्या. झालेला प्रकार काकांनी अवघ्या १० सेकंड मध्ये सांगितला.
पुन्हा sannn आवाज आला !

बाबा समीरकडे वळाले, “अरे बाळा आत रूम मध्ये जा, अनुज येईलच थोड्या वेळात”
मान डोलवत दोघे सहाणेबाळं रूम मध्ये गेली, दरवाजा बंद केला आणि ‘खी खी खी’ आवाजावर जितका control ठेवता येईल तितका ठेऊन करून फुदकली.

तब्बल १० मिनीटांनी लाल झालेला अनुज रूममध्ये आला, “अबे, अडीच तासा पुर्वी! काही लाज आहे का नाही?”

समीरने लगेच उत्तर दिले, “तुच म्हंटला ना की तू २:२० ला झोपला. घड्याळात बघ किती वाजले – ५:३०. जवळपास तीन तास झाले की नाही? तरी आम्ही अर्धा तास कमी सांगितला”
चेतन पण दात काढत मान डोलवत बसला.

अनुज बाल्कनी मध्ये गेला, स्टूल आणला. भिंती वरच्या घड्याळातले काटे पुन्हा फिरवले. उतरला आणि समीरच्या समोर जाऊन बसला.

चेतन आणि समीरने त्याच्या खांद्यावरून हात फिरवला. समीर म्हंटला, “जाऊ दे आता अनुज, चल आपण आत्ता १४ वा chapter करू!”

तिघे मित्र पोट धरून हसली. अनुज तेव्हा कदाचित कमी हसला असेल दोघांच्या पेक्षा कारण शेवटी गाल पण सळसळत असणार पण आजच्या कळत जेव्हा कधी त्या रात्रीच्या अभ्यासाची आठवण येते तेव्हा तेव्हा डोळ्यातून पाणी येई पर्यंत हसतो आमचा अनुज!

Previous Harmony in progress, Victory will follow
Next Not quite a return!

No Comment

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *