Days Under the Crescent SunStoryPune1990s

Chapter 14

हर एक दोस्त कमीना होता हैHar ek dost kamina hota haiEvery friend is a scoundrel

अभ्यासाला जायचे म्हणजे झोपायला जायचे, हे तिघांनाही माहीत होते. फक्त अनुजला ते उशिरा कळले — रात्री दोन वाजता, आणि बाबांसमोर.All three boys knew that “going to study” meant “going to sleep”. Anuj was the only one who forgot, and he was reminded at 2 a.m., in front of his father.

By Vinaay Patil१२ मिनिटे वाचन11 min read
मूळ गोष्ट मराठीत आहे. English version साठी वरचे बटण.Originally written in Marathi. Switch above for either version.
Pen-and-ink and watercolour, night: in a 1990s bedroom a grinning boy stands on a wooden stool turning the hands of a big round wall clock, while two boys sleep soundly in beds below him; two wristwatches lie on a small table between the beds and a balcony door shows the dark night outside.
रात्री दोन वाजता, स्टूलवर उभा अनुज: दोनचे पाच.2 a.m., Anuj on the stool: two becomes five.

Information Overload

“अरे समीर, आज कसा काय आलास?”, काकूंनी विचारले.

चेहऱ्यावरचे हावभाव बघितले तर कळले नसते की नक्की प्रश्न कोणाला पडला आहे — काकूंना की समीरला!

नेहमीप्रमाणे चेतनने दोन्ही पार्टींना अंधारात ठेवले होते. चेतन समीरला फक्त “तू ये” एवढेच बोलला होता, आणि चेतन बोलावतोय म्हणजे काहीतरी टाईमपासच असणार, या हिशोबाने समीर आला होता. त्यामुळे काय उत्तर द्यायचे ते समीरला कळेना. “काकू, सायकलला लॉक लावायचे राहिले” असे बोलून तो पटकन दाराबाहेर पडला.

समीरचा आवाज ऐकून चेतन हातातले थालीपीठ सोडून किचनमधून हॉलकडे धावला. आपली पोल उघडी पडू नये म्हणून पटकन बोलला, “अगं आई, आम्ही दोघे अनुजकडे अभ्यासाला जाणार आहोत, म्हणून तो आला आहे.”

A 1990s Pune living room: a mother in a blue saree sits on a sofa with her arms folded and an unconvinced look, while a boy in a white shirt and yellow shorts gestures grandly at her; at the open door a second boy with a school bag and a bicycle waits, looking unsure.
CEO चे presentation. President ना काही पटलेले नाही.

दाराबाहेर उभ्या समीरने ‘अभ्यास’ हा शब्द ऐकला आणि अजूनच चक्रावला. ‘कसला अभ्यास? मी तर दप्तरसुद्धा आणले नाही!’

“अनुजकडे कशाला? इकडेच करा की”, काकूंनी सुचवले.

“नाही, आम्हाला एकत्र अभ्यास करायचा आहे”, चेतनने तत्परतेने उत्तर दिले.

“का?”, काकूंनी inquiry चालू ठेवली.

“आम्ही तसे ठरवले आहे”, चेतनने उत्तर दिले — जणू तो कुठल्यातरी कंपनीचा CEO आहे आणि हा त्याचा executive decision आहे. चेतनच्या आवाजातला confidence (over) ऐकून समीर परत घरात शिरला. आज हा पिटणार, आणि ते बघायची संधी सोडायची नाही, हा समीरचा विचार.

“काही नका ठरवू. इकडेच करा अभ्यास.” काहीही झाले तरी काकू President होत्या. त्यांनी CEO चे proposal उचलून फेकून दिले.

“अगं, अनुजकडून आम्हाला Geographyचा एक चॅप्टर समजून घ्यायचा आहे”, चेतनने नवीन बॉल टाकला.

“का? तुम्हाला नाही येत का?” काकूंनी बॉलचा टप्पा पडण्याआधीच सिक्स मारला.

बुद्धिबळात याला चेक अँड मेट म्हणतात. “हो” म्हटले तर मग जायची गरज काय? आणि “नाही” म्हटले, तर शाळेत काय झोपा काढतोस का, म्हणून एक-दोन धपाटे ठरलेले.

पण चेतन हार मानणाऱ्यांतला नव्हता. त्याने विचारपूर्वक defence सुरू केला: “अगं, आम्ही प्लॅन केलाय. प्रत्येक जण एक चॅप्टर करणार आणि एकमेकांना परीक्षेच्या हिशोबाने नीट समजावणार. अनुजला जुने पेपर मिळाले आहेत. त्याने Tropical Regionचा चॅप्टर एकदम पक्का केलाय आणि मी Arcticचा. मग एकमेकांना शिकवणार, doubts clear करणार, म्हणजे सगळ्यांचे सगळे चॅप्टर पक्के. काही topic गुंतागुंतीचे आहेत, त्यात परीक्षा, म्हणून हा प्लॅन.”

याला technical term आहे — Information Overload: इतकी माहिती द्या, की समोरचा ती sort करण्यातच confuse होऊन जाईल. गोलंदाजाने एकदम पाच बॉल टाकले, तर मारायचा कुठला?

काकूंनी नजर spectator समीरकडे वळवली. “मग तू कुठला चॅप्टर केला आहेस?”

समीरने एकदम confidently उत्तर दिले, “चौदावा.”

वातावरण एकदम शांत झाले. तिघे एकमेकांकडे बघत होते; सामना नक्की कोणी जिंकला, कोणालाच कळेना. चेतनने मौका साधला — “चल चल, सायकल काढ, उशीर होईल” — आणि काकूंच्या मनात अजून काही येण्याआधी दोघे बाहेर पडले. सायकलवर बसताना नेहमीच्या routine instructions मिळाल्या: नीट जा, लक्ष दे, अभ्यासच करा.

पाचची पन्नास

अनुजचे घर चालत पंधरा मिनिटांवर, सायकलने जेमतेम पाच. तेवढ्यात समीरची शाळा घ्यावी असे चेतनला वाटले. जगातला सर्वात सज्जन, कधीही थापा न मारणारा सोज्वळ बाळ असल्याचा चेहरा करून तो म्हणाला, “सम्या, फेकताना किती confidence रे!”

“का रे? काय झाले?”, सम्यानेही जरा sarcastic टोनमध्ये विचारले.

“अरे ढोल! आपल्या Geographyच्या पुस्तकात बाराच चॅप्टर आहेत. तू चौदावा काढलास कुठून?”

“तिथूनच, जिथून तू अनुजकडे जुने पेपर काढलेस.”

हजरजबाबीत समीर एक नंबर होता. त्यामुळे चेतनने विषय ताणला नाही. शिवाय निघण्याच्या गडबडीत थालीपीठ राहिले, याची रुखरुख त्याला जास्त होती. सायकल आपोआप ‘अप्पाची खिचडी’ समोर जाऊन थांबली.

समोसा आणि भजी ऑर्डर झाली. भज्यांसाठी उगाचच extra चटणी. लोक भजी चिंचेच्या चटणीला टेकवून टेकवून चवीपुरती घेतात; या दोघांनी मात्र सांबारवडा घेतल्यासारखी प्लेटभर चटणी घेतली आणि त्यात भज्यांना अंघोळ घालून खाल्ली. नंतर लिंबू-पाणी.

शेवटपर्यंत खिचडी काही ऑर्डर केली नाही. चेतनचे म्हणणे: अप्पाला खिचडीवर फुल्ल confidence असता, तर त्याने फक्त खिचडीच ठेवली असती, समोसा बनवलाच नसता. त्यालाच स्वतःच्या खिचडीवर confidence नाही, तर आपण कशाला दाखवायचा? निघताना एक समोसा पार्सल.

Two boys at a roadside snack stall table: one lifts a bhaji dripping with dark chutney over a plate heaped with bhajis and a bowl of chutney, the other happily holds a samosa beside a plate of samosas; glasses of nimbu-paani, a paper parcel and a parked bicycle sit nearby, and a cook works a big kadhai at the back.
भज्यांना चटणीत अंघोळ. खिचडी: ऑर्डर नाही.

पाच मिनिटांच्या journeyला पन्नास मिनिटे लावून दोघे अनुजच्या सोसायटीत पोचले.

सेकंड inquiry

अनुज स्वतः स्वागताला गेटवर उभा होता. तावातावाने बोलला, “अबे, किती वेळ? कुठे हरवला होतात? पंधरा मिनिटे झाली, चेतनच्या घरून फोन येतोय — पोचले का नाही म्हणून!”

अनुजला hyper व्हायची सवय होती, आणि समीर-चेतनला त्याच्या या वाढीव स्वभावाची सवय होती. त्यांनी काहीच reaction दिली नाही; शांतपणे त्याच्याकडे बघत राहिले. अनुज जरा शांत झाला आणि लगेच म्हणाला, “समोसा?” चेतनने समोसा दिला.

समोसा खात खात अनुज चालू झाला, “बाबा विचारत होते, काय सांगू? मग मीच बोललो की झेरॉक्स काढायला थांबले असतील. मी बघून येतो, म्हणून खाली आलो.” दोघे अनुजकडे येण्याची ही शंभरावी वेळ होती, तरी अनुज चालूच: “अबे सायकल जरा आडवी लाव, त्या खांबाला टेकून, जास्त पुढे नको… अबे लॉक लावले का रे?” कोणीही चुकूनसुद्धा उत्तर दिले नाही.

पण या उगाचच्या शहाणपणाच्या नादात अनुजलाच भान राहिले नाही. पार्किंगमध्ये एकच बीम एक फूट खाली होती, आणि पठ्ठ्या बरोब्बर त्याच बीमवर जाऊन आपटला. डोकं ठणकले.

“अरे अनुज, जरा जपून! डोकं सांभाळ. रिकाम्या गोष्टी लगेच फुटतात”, समीरने लगेच टोमणा मारला. चेतनने ‘खी खी खी खी खी’ करत background effect दिला.

रक्त निघाले की काय, या चिंतेत अनुज डोक्यावर हात चोळत राहिला — तीन-चार वेळा. “अरे घासून घासून केस घालवशील… टकल्या! चल वर”, या वेळी टोमणा चेतनचा.

अनुजचे घर पहिल्या मजल्यावर. घरात शिरताच बाबांनी विचारले, “का रे, गर्दी होती का झेरॉक्सला?”

“हो…ओ”, तिघांनी सामूहिक उत्तर दिले. स्वरही जुळला होता, हे मान्य करायला हवे.

“तुमचा आवाज आला, तेव्हाच मी तुझ्या घरी फोन करून सांगितले की पोचले. पण वर यायला एवढा वेळ का लागला? एकच मजला तर आहे!”

“ते अनुजचं डोकं बीमला धडकलं”, चेतन ओकला. “तरी त्याला सांगत होतो, लक्ष दे.”

“अरे, तू इथे राहतोस. त्यांनी तुला नाही, तू त्यांना सांगायला पाहिजे!” बाबांनी अनुजला टोकले.

अनुज मान खाली घालून जमिनीकडे बघत राहिला. पर्याय नव्हता — एकीकडे बाबा, दुसरीकडे मित्र. (हर एक दोस्त कमीना होता है।)

“जा आता आत, अभ्यास करा.” आणि तिघे एकामागून एक अनुजच्या रूमकडे गेले.

अभ्यासाची सुरुवात

रूममध्ये शिरताच अनुज पुन्हा चालू झाला, “अबे, माझ्यावर काय ढकलता रे? उशीर तुम्ही केला आणि बोलणी मला!”

“खाली समोसा खायची घाई कोणाला होती? वर बसून पण खाल्ला असता ना?” समीरने पुन्हा अनुजची बोलती बंद केली. समीर बोलला की समोरच्याची बोलती बंद होते, हे माहीत असूनही सगळे मित्र विषाची परीक्षा का घेतात, ही एक mysteryच आहे.

अनुजने विषय बदलला, “चला, आता आपण Historyचा अभ्यास करू.”

“हिस्टरी? का गोरेग्राफी? काय करणार आहेस तू?” समीरने विचारले.

“मी नाही. आपण.”

‘आपण’ ऐकल्यावर चेतन आणि समीर एका स्वरात खी खी खी करू लागले.

“अरे अंड्या, वेडा आहेस का? अभ्यासच करायचा असता, तर माझ्या घरी नसतो का बसलो, जाड्या!” चेतनने संदर्भासहित स्पष्टीकरण दिले. “आज रात्री काका-काकू येणार आहेत, उशिरा दोनला पोचतील. ते येईपर्यंत घरी सगळे जागे राहणार, आणि मला काहीतरी वाचत बसावे लागणार. त्यापासून वाचण्यासाठी हा प्लॅन — मस्तपैकी झोप काढायला इकडे आलोय, आणि तू सांगतोस History करू!”

समीरने त्यात ॲड केले, “मी पण दोन दिवस नीट झोपलो नाही. काल गुरुवारी रात्री दोन वाजताचा पिक्चर बघायला जागरण झालंय. तू किती वाजेपर्यंत अभ्यास करणार आहेस?”

“माझा विचार होता, पहाटे पाचपर्यंत करू!”

हे उत्तर ऐकून चेतन आणि समीरची खात्री झाली की मगाशी डोक्याला लागलेला मार खूपच डीप गेला आहे. दोघांनी घड्याळाकडे बघितले. वाजले होते दहा, आणि हा पठ्ठ्या पहाटे पाचपर्यंत जागणार!

त्याची ambition बघून सम्याला खरे तर हसूच आले, पण अनुजची अजून खेचायची म्हणून तो म्हणाला, “एक काम कर अनुज. पहाटे तू झोपायला जाताना मला उठव, मग मी अभ्यास करतो.”

चेतनला जोकमध्येसुद्धा अभ्यासाशी संबंध ठेवायचा नव्हता. सम्याच्या स्वरात स्वर न मिसळता तो पांघरूण घेऊन झोपायच्या तयारीला लागला. सम्यानेही पटकन पांघरूण घेतले आणि अजून एक टोला दिला, “बघ अनुज, उठव, पण पाचच्या आधी नको हं… तू नक्की जागणार आहेस ना पाचपर्यंत? नाहीतर मी alarm लावतो.”

पण अनुज जोकच्या पलीकडे गेला होता. त्याचा निर्धार पक्का होता: आज Historyचा अभ्यास करून आपण इतिहास घडवणार.

Night in a bedroom: a boy sits at a study table under a desk lamp, head propped on one hand, eyes drooping over a thick open book, while two friends sleep in the beds behind him, one snoring; the wall clock shows ten o'clock.
रात्रीचे दहा. आज इतिहास घडणार होता.

बदला

दहाचे अकरा झाले. झोपलेली दोन कारटी आता जोरजोरात घोरू लागली होती. त्या घोरण्यातही एक सूर होता, आणि अनुजही त्या सुरात डुलू लागला. डुलत डुलत दहा-पंधरा ओळी वाचायचा; मग आपण काय वाचतोय याचा संदर्भच लागायचा नाही. मग दहा ओळी मागे, पाच पुढे… असे करत करत पुढच्या चार तासांत अख्खी चार पाने वाचली! चॅप्टर अजून दहा पानांचा.

असे करत आपले काही होणार नाही, म्हणून अनुज झोपायला जागा करू लागला.

पण दोघांचे शांत, तृप्त चेहरे बघून त्याची चिडचिड झाली. यांच्या घोरण्यामुळे आपला अभ्यास झाला नाही. यांच्यामुळेच मगाशी बाबांची बोलणी खावी लागली. आणि बघा आता कसे झोपलेत! या विचारांनी झोपेला टेकलेला मेंदू जागा झाला; आतले किडे जागृत झाले. घड्याळात दोन वाजले होते. मगाशी सम्या केवढे टोमणे मारत होता — ‘पाचला उठव, पाचला!’

…“बदला!” — त्याची ट्यूब पेटली.

अनुज आता वेगळ्याच missionला लागला. बाल्कनीतून स्टूल आणला आणि भिंतीवरच्या घड्याळातले दोनचे पाच केले. समीर आणि चेतनची घड्याळे टेबलवर काढून ठेवलेली होती; त्यांचेही काटे फिरवले.

आणि मग जप लावला, “समीर उठ, समीर उठ!” — हे बोलताना मुद्दाम चेतनला हलवत. दोघांचे डोळे उघडले; काय झाले काही कळेना. अनुजने character सोडले नाही: “अबे उठा उठा, पाच वाजले! तुम्हीच बोलला होतात ना अभ्यास करायचा आहे? उठा!”

चेतनने ignore करून कुशी बदलली, पण अनुज थांबला नाही. दोघेही उठून बसेपर्यंत तो चालूच होता. दोघांची झोपमोड झाल्याची खात्री पटल्यावर अनुजने पांघरूण घेतले आणि स्वतः झोपला.

चौदावा चॅप्टर

‘झोपण्याआधी आपण पहाटे उठव असे काही बोललो होतो का?’ — झोपेत असलेल्या चेतनला काही कळेना.

समीरचाही थोडा गोंधळ उडाला होता. तो ज्या बेडवर झोपला होता, तो टेबलला एकदम चिकटून होता. उठून बसल्यावर टेबल समोर आले, आणि त्यावरची पुस्तकेही. समीरने instinctively त्यातले एक पुस्तक उचलले.

‘अरे! हा तर अभ्यासाला लागला!’ चेतनला काहीच कळेना. पण आता उठलोच आहे तर बाथरूमला जाऊन येऊ, म्हणून तो उठला.

इकडे समीर, एखादे लहान बाळ नवीन वस्तूकडे बघते तसा, त्या पुस्तकाकडे बघू लागला. साईझ मोठी, फुलस्केप — workbook असावी. पण ही तर भरलेली आहे! आतापर्यंतच्या सगळ्या workbook रिकाम्या असतात, आणि रिकाम्याच राहतात. मोठी पुस्तके म्हणजे एक तर ड्रॉइंग, नाहीतर Geography. अनुजच्या मोठ्या भावाचे असेल? नाही — अनुज कधी चहा, कधी पाणी सांडेल याचा भरोसा नाही, म्हणून भाऊ आपली पुस्तके अनुजच्या टेबलावर ठेवण्याची risk कधीच घेणार नाही.

मग ठरले — हे Geographyचे पुस्तक आहे!

Parallel-ly, बाथरूममध्ये चेतनचे झोपेतले प्रयोग चालू होते. नळाला पाणी कसे येणार, हा प्रश्न त्याला भेडसावत होता. ‘या अंड्याला पण लई हौस! साधे गोल गोल फिरणारे नळ लावायचे, हे लिव्हर कसले?’ ओढले तरी पाणी नाही. ‘हे बटण कसले? ओढून बघू…’ आणि पिक्चरमध्ये दाखवतात तसा शॉवर चालू झाला — थेट चेतनच्या डोक्यावर!

झोप उडाली. भिजता भिजता वाचला: थोडा शर्ट, तोंड आणि पाय भिजले होते, पण मेन म्हणजे पॅन्ट ओली झाली नव्हती!

Split scene: on the left a sleepy boy sits up in bed staring wide-eyed at a large book held in both hands; on the right, through a doorway, another boy jumps in alarm as a shower sprays over his head, clutching his trousers to keep them dry.
Parallel-ly: एकाला पुस्तक सापडले, दुसऱ्याला शॉवर.

टाप टाप टाप

चेतनचा गोंधळ संपला. समीरला अजूनही खात्री नव्हती की हे Geographyचेच पुस्तक आहे. अनुज deep sleepमध्ये गेला होता. वातावरण पुन्हा शांत झाले.

तितक्यात त्या शांत रात्री, हिंदी horror सिनेमात backgroundला वापरतात तसा आवाज आला — टाप… टाप… टाप.

कोणीतरी चालत रूमकडे येत होते. दोन्ही गडी अजून अर्धवट झोपेत होते; काय करावे कळेना. चेतन बाथरूममध्येच आवाज ऐकत बसला, आणि समीर पुस्तकाच्या रहस्यात इतका मग्न होता की त्याला बहुतेक आवाज आलाच नाही.

चेतनने बाथरूमला जाताना रूम लॉक केली नव्हती. एक धक्का — आणि बाबा आत!

समोरच समीर पुस्तकाकडे एकटक बघताना दिसला, आणि instant दाद मिळाली: “वा! अभ्यास जोरात चाललाय. शाब्बास पोरा! कुठला अभ्यास करतोयस बाळा?”

A moustached father in spectacles, white vest, striped pyjama and wristwatch stands in the bedroom doorway pointing at a boy who is reading a book very seriously in bed by lamplight; a third boy is a lump under a flowered blanket, and a fourth face peeps out wide-eyed from the bathroom door.
“शाब्बास पोरा!” — चुकीच्या पोराला.

“Geography”, नेहमीच्या confidenceने instant उत्तर.

“काय वाचतोयस?”

पुन्हा त्याच confidenceने: “चौदावा चॅप्टर!”

बाथरूममध्ये ‘चौदावा चॅप्टर’ ऐकून चेतनची तारांबळ उडाली. अजून काही विपरीत घडण्याआधी बाहेर पडावे म्हणून पटापट तोंड, हात, पाय पुसून तो बाहेर आला आणि बाबांच्या मागोमाग रूममध्ये शिरला. चेतनला बघून बाबांना थोडा shock बसला. एवढा वेळ त्यांना वाटत होते, बाथरूममध्ये अनुज आहे — आणि बाहेर पडला चेतन!

“अनुज कुठे आहे?”

समीर आणि चेतनने मराठी सीरियलमधल्या कलाकारांसारखी — एकदम slow motion, full dramatic — मान वळवून पांघरुणाकडे बघितले. रात्रीची शांतता असूनही सीरियलसारखे ‘ढिश्श… ढिश्श… ढिश्श’ आवाज येत असल्याचा फील आला.

समीर एकदम शांत, निरागसपणे म्हणाला, “अनुज ना… तो झोपला.”

बाबांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी चेतनकडे बघितले आणि थोडा टोन सावरत विचारले, “तू कुठे होतास?”

चेतन कितीही झोपेत असो, आग लागली आहे हे त्याला कळते, आणि त्या आगीतून स्वतःला कसे वाचवायचे हेही. ‘आत्ताच उठलो’ म्हटले तर आग आपल्यावर येणार. म्हणून त्याने एकदम styleमध्ये तोंड पुसत उत्तर दिले, “झोप लागायला लागली होती, म्हणून तोंड धुऊन झोप घालवायला गेलो होतो. आज Geography संपवायची आहे ना!”

हे उत्तर म्हणजे सुतळी बॉम्बच्या वातीला अगरबत्तीने लावलेला छोटासा लाल टिळा. चेतनने वात पेटवली आणि बॉम्बपासून लांब गेला — समीरच्या शेजारी जाऊन उगाचच एक पुस्तक उचलले.

स्फोट होणारच होता, आणि तो झाला. “अनुज, उठ!” — इतक्या जोरात, की अख्ख्या सोसायटीतले अनुज, अनिकेत, अनिवेश — नावात ‘अ’ आणि ‘न’ असलेले सगळे जागे झाले असतील!

अनुज ताडकन उठला आणि एकाच मोशनमध्ये उभा राहिला. समोर संतापलेले बाबा, बाजूला समीर आणि चेतन हातात एक-एक पुस्तक घेऊन. त्यात चेतनने तर पुस्तक उलटे धरले होते.

बाबा पुढे काही बोलले नाहीत. वळले आणि हॉलमध्ये जाऊन बसले.

हॉलमधली सुनावणी

काही न बोलताही पार्टीला कळले की follow करायचे आहे. अनुजच्या मागे समीर, समीरच्या मागे चेतन. अनुज एकटा बाबांसमोर जाऊन उभा राहिला; चेतन हॉलच्या दाराला धरून थांबला आणि समीरलाही जवळ ओढले. काय झाले हे अनुजला कळले नव्हते, पण बाबा ओरडले म्हणजे आपण कुठेतरी काशी केली आहे, एवढे कळले. तो मान खाली घालून उभा राहिला.

“काय चाललंय? तो समीर बघ — स्वतःच्या घरी अभ्यास होणार नाही म्हणून इकडे येऊन अभ्यास करतोय, आणि तू झोपा काढ! लाज, लज्जा, शरम काही आहे का?”

“अहो बाबा, मी आत्ताच झोपलो. हे झोपले होते, मी एकटा अभ्यास करत होतो”, गुन्हेगाराने विनवणी सुरू केली.

“मग मी काय बघितलं? चेतन मला एरवी रिलॅक्स करणारा वाटतो. तो झोप येऊ नये म्हणून तोंड धुतोय, आणि तू झोपा काढ! रात्रभर अभ्यास करणार म्हणे!” हे बोलताना बाबांचे बोट चेतनकडे होते. अनुजही आश्चर्याने चेतनकडे बघू लागला — ‘हा अभ्यासासाठी तोंड धूत होता?!’

लांब लपून बसल्यामुळे चेतनला नीट ऐकू येत नव्हते. अनुज आणि बाबा आपल्याकडे का बघतायत, हा प्रश्न त्याला पडला. त्याने हळू आवाजात समीरला विचारले, “ते आपल्याला बोलतायत का अनुजला? लैच जोरात बोलतायत. ए सम्या, ते आत्ता माझं नाव घेत होते का रे?”

समीर मात्र एकटक बाबांचे बोलणे ऐकत होता. आग कुठल्याही क्षणी आपल्याकडे वळू शकते, याचा त्याला अंदाज होता. fire extinguisher म्हणून तो मगासचे पुस्तक घेऊनच आला होता. पण आगीत पडणार कोण — आपण की मित्र? अर्थातच वेळ आली तर मित्रालाच ढकलावे लागेल. आणि चेतन जितका अंधारात राहील, तितके ढकलायला सोपे. म्हणून समीरने चेतनचे सगळे प्रश्न ignore केले.

बाबांनी स्वतःच्या मनगटावरच्या घड्याळाकडे बघत विचारले, “आता अडीच वाजलेत. तू कधी झोपलास?”

In the living room at night, under a wall clock showing half past two, the angry father points at a boy who stands with his head bowed; behind them a second boy hugs a book to his chest with a calm little smile and a third peeps round the door frame.
हॉलच्या घड्याळात अडीच. बाबांच्या घड्याळात अडीच. अनुजच्या रूमचे मत वेगळे होते.

“आत्ता दोन वीसला. मीच यांना उठवून झोपलो”, अनुजने defence सुरू केला.

बाबांनी समीरकडे बघितले. तिघांत समीरचा stock वाढला होता; अनुजचा आधीच down होता, आणि आता तर negative. समीर, त्याच्या हातातले पुस्तक, त्याचा sincere चेहरा — श्रावणबाळच ते!

“समीर, खरं सांग बाळा. तुझा मित्र आहे म्हणून खोटं नको बोलू. हा अभ्यास करत होता का नाही?”

समीरच्या मागे लपलेल्या चेतनची वेगळीच धांदल उडाली होती. ‘अडीच कसे काय वाजले? आपण तर पाचला उठलो! माझ्या घड्याळात सव्वापाच झाले होते. एकतर आपण time travel केलाय, नाहीतर स्वप्न बघतोय.’

पण समीर नेहमीप्रमाणे शांत — इंग्रजीत ज्याला stoic म्हणतात. Pressureमध्ये त्याचे डोके चालते. त्याने हॉलमधल्या घड्याळात बघितले: अडीच. बाबांच्या मनगटावर: अडीच. मग रूममधल्या भिंतीवरच्या घड्याळात पाच कसे वाजले होते? अनुजकडे बघितले; अनुजने त्याच्याकडे. त्या क्षणातच समीरला कळले — अनुजने किडे केले आहेत.

“खरंच बाबा, मी अभ्यास करत होतो”, अनुज पुन्हा म्हणाला.

“हो का? कुठला अभ्यास केलास?”

“History.”

बाबा चेतनकडे वळले. “चेतन, तू कसला अभ्यास करत होतास? आणि समीर, तू अजिबात सांगू नकोस.”

समीरचे पारडे जड आहे, हे चेतनने ओळखले होते. अनुज की समीर, हिस्टरी की जॉग्रफी — चेतनने correct उत्तर दिले: “Geography!”

“कुठपर्यंत आला अभ्यास?”

“चौदावा चॅप्टर!!”

अनुजला काहीच कळेना. Geographyत चौदावा चॅप्टर आला कुठून? “अबे, काहीही काय…”

अनुजच्या तोंडातला ‘अबे’ थेट बाबांच्या मस्तकात गेला. “अनुज! बोलण्याची काही पद्धत? एकतर खोटं बोलतोयस, आणि हा वरचढपणा कुठला?”

बाबा उठून उभे राहिले आणि समीर-चेतनला एकदम फायनल विचारले, “खरं सांगा. हा तुमच्याबरोबर अभ्यास करत होता की नाही? हा कधी झोपला?”

समीरने stoicपणे, एकदम शांत स्वरात उत्तर दिले, “हा अडीच तासांपूर्वी झोपला.”

चेतननेही मान डोलावली. दोघे एकदम syncमध्ये एक पाऊल मागे सरकले — बाबांना हात मोकळे करायला जागा!

सन्न्न्!

आवाज ऐकून काकूही हॉलमध्ये आल्या. झालेला प्रकार काकांनी अवघ्या दहा सेकंदांत सांगितला. पुन्हा — सन्न्न्!

बाबा समीरकडे वळले, “अरे बाळा, तुम्ही आत रूममध्ये जा. अनुज येईलच थोड्या वेळात.”

साडेपाच

मान डोलावत दोघे शहाणी बाळे रूममध्ये गेली, दार बंद केले, आणि ‘खी खी खी’वर जितका control ठेवता येईल तितका ठेवत फुदकली.

तब्बल दहा मिनिटांनी लालबुंद अनुज रूममध्ये आला. “अबे, अडीच तासांपूर्वी? काही लाज आहे का नाही?”

समीरने लगेच उत्तर दिले, “तूच म्हणालास ना, दोन वीसला झोपलो?” भिंतीवरच्या घड्याळाकडे बोट दाखवत, “बघ किती वाजलेत — साडेपाच. जवळपास तीन तास झाले की नाही? तरी आम्ही अर्धा तास कमीच सांगितला.”

चेतनही दात काढत मान डोलावत बसला.

अनुज बाल्कनीत गेला, स्टूल आणला, भिंतीवरच्या घड्याळाचे काटे पुन्हा फिरवले. खाली उतरला आणि समीरसमोर जाऊन बसला.

चेतन आणि समीरने त्याच्या खांद्यावर हात फिरवला. समीर म्हणाला, “जाऊ दे आता अनुज. चल, आपण आत्ता चौदावा चॅप्टर करू!”

तिघे मित्र पोट धरून हसले.

Back in the bedroom by lamplight, three boys sit up in bed: one points cheerfully at the wall clock, which shows half past five, the boy in the middle rests his chin on his hand looking put out, and the third laughs with his eyes shut.
“बघ किती वाजलेत — साडेपाच.”

अनुज तेव्हा कदाचित त्या दोघांपेक्षा कमी हसला असेल — गाल चुरचुरत असणार. पण आज जेव्हा जेव्हा त्या रात्रीच्या अभ्यासाची आठवण निघते, तेव्हा तेव्हा तो डोळ्यांतून पाणी येईपर्यंत हसतो!

Three grown men laugh around a table covered in old photographs, tea and a plate of samosas; behind them, like memories pinned to the wall, are sketches of that night: the boy on the stool at the clock, the book, the shower, the father in the doorway and the three boys in bed.
आज, जेव्हा जेव्हा त्या रात्रीची आठवण निघते.

— विनय पाटील

आजचा धडा

एकत्र अभ्यासाचे सूत्र

  • झोपलेले२
  • अभ्यास करणारा१
  • फिरवलेले घड्याळ१ (दोनदा)
  • पुस्तकातले चॅप्टर१२
  • सांगितलेला चॅप्टर१४
  • ज्याने अभ्यास केला त्यालासन्न्न् ×२
हर एक दोस्त कमीना होता है

INFORMATION OVERLOAD

"Arre Sameer, what brings you here today?" asked Kaku.

Judging by the faces, it was hard to tell who was more puzzled by the question, Kaku or Sameer.

As usual, Chetan had kept both parties in the dark. All he had told Sameer was "come over", and since Chetan calling meant timepass, Sameer had come. Now he had no idea what to answer. "Kaku, I forgot to lock the cycle," he said, and slipped out of the door.

Hearing Sameer's voice, Chetan abandoned the thalipeeth in his hand and ran from the kitchen to the hall. Before his cover could be blown, he said, "Aai, the two of us are going to Anuj's to study. That's why he's here."

A 1990s Pune living room: a mother in a blue saree sits on a sofa with her arms folded and an unconvinced look, while a boy in a white shirt and yellow shorts gestures grandly at her; at the open door a second boy with a school bag and a bicycle waits, looking unsure.
The CEO presents. The President is not convinced.

Standing outside the door, Sameer heard the word study and was even more baffled. What study? I haven't even brought my school bag!

"Why Anuj's? Study here," Kaku suggested.

"No, we want to do combined study," Chetan replied promptly.

"Why?" Kaku continued the inquiry.

"We have decided so," said Chetan, in the manner of a CEO announcing an executive decision. Hearing the (over)confidence in Chetan's voice, Sameer stepped back inside. Chetan was about to get thrashed, and Sameer was not going to miss it.

"Don't decide anything. Study here." Whatever happened, Kaku was the President. She picked up the CEO's proposal and threw it out.

"Aai, we need Anuj to explain one Geography chapter to us," Chetan bowled a new ball.

"Why? Don't you know it?" Kaku hit it for six before it could even pitch.

This was checkmate. Say yes, and why go at all? Say no, and the follow-up was "What do you do in school, sleep?" plus a couple of dhapate.

But Chetan was not one to give up. He began his defence with care: "Aai, we've made a plan. Each of us does one chapter and explains it to the others properly, from the exam point of view. Anuj has got old question papers. He's mastered the chapter on Tropical Regions, and I've done the Arctic. Then we teach each other, clear our doubts, and everybody has every chapter ready. Some topics are complicated, and exams are coming, hence the plan."

There is a technical term for this: information overload. Give so much information that the other person gets confused just sorting it. When the bowler sends down five balls at once, which one do you hit?

Kaku turned her gaze to Sameer, the spectator. "So which chapter have you done?"

Sameer answered with full confidence: "The fourteenth."

The room went silent. The three looked at one another, and nobody could tell who had won the match. Chetan seized the moment, "Come on, take the cycle out, we'll be late," and before anything else could occur to Kaku, the two were out of the door. As they got on their cycles, the routine instructions followed them: ride carefully, pay attention, and only study.

FIVE BECOMES FIFTY

Anuj's house was fifteen minutes away on foot, barely five by cycle. Chetan decided to use the time to take Sameer's class. Putting on the face of the most decent, never-lying, butter-wouldn't-melt boy in the world, he said, "Samya, the confidence when you throw a fast one, re!"

"Why? What happened?" asked Samya, a little sarcastically himself.

"Arre dhol! Our Geography book has only twelve chapters. Where did you get the fourteenth from?"

"The same place you got Anuj's old question papers from."

Sameer was ek number at comebacks, so Chetan let it go. Besides, he was more upset about the thalipeeth he had left behind in the rush. The cycle stopped on its own in front of Appachi Khichdi.

Samosa and bhaji were ordered, plus an unnecessary extra chutney for the bhaji. Normal people dab their bhaji into the tamarind chutney for a little taste. These two took a plateful of chutney, as if they had ordered sambar-vada, and ate the bhaji only after giving each one a bath in it. Then nimbu-paani.

They never ordered the khichdi. Chetan's argument: if Appa had full confidence in his khichdi, he would have served only khichdi and never made samosas. If he didn't have confidence in his own khichdi, why should they? On the way out, one samosa, parcel.

Two boys at a roadside snack stall table: one lifts a bhaji dripping with dark chutney over a plate heaped with bhajis and a bowl of chutney, the other happily holds a samosa beside a plate of samosas; glasses of nimbu-paani, a paper parcel and a parked bicycle sit nearby, and a cook works a big kadhai at the back.
Bhaji, given a bath. Khichdi, not ordered.

Taking fifty minutes over a five-minute journey, the two reached Anuj's society.

SECOND INQUIRY

Anuj was standing at the gate to receive them, fuming. "Abe, how long? Where were you lost? For fifteen minutes Chetan's house has been calling to ask if you've reached!"

Anuj had a habit of getting hyper, and Sameer and Chetan had a habit of ignoring it. They gave no reaction and just looked at him calmly. Anuj cooled down a little and immediately said, "Samosa?" Chetan handed it over.

Eating it, Anuj carried on. "Baba was asking, what do I say? So I said you must have stopped to get xeroxes. I told him I'd go down and check." It was the hundredth time the two had come to Anuj's house, yet he kept going: "Abe, park the cycle sideways, against that pillar, not too far forward... abe, did you lock it?" Nobody answered him, even by mistake.

But busy being needlessly wise, Anuj stopped paying attention himself. His parking had one beam that hung a foot lower than the rest, and this patthya walked straight into exactly that beam. His head rang.

"Arre Anuj, careful! Look after your head. Empty things break easily," Sameer quipped at once. Chetan provided the background effect: khi khi khi khi khi.

In a building parking area under a low concrete beam, a boy clutches his head with little stars of pain around it, while one friend doubles over laughing and pointing at him and another, leaning on a bicycle, smirks.
Empty things break easily.

Worried that he was bleeding, Anuj kept rubbing his head, three or four times. "You'll rub all your hair off... taklya! Come up," said Chetan, taking his turn at the taunting.

Anuj lived on the first floor. As soon as they entered, Baba asked, "So, was there a crowd at the xerox shop?"

"Ye...es," the three answered together. To be fair, they were even in tune.

"I heard your voices and phoned your house to say you'd arrived. But why did it take so long to come up? It's one floor!"

"Anuj's head hit the beam," Chetan blurted. "I kept telling him to look where he was going."

"Arre, you live here. You should be telling them, not the other way round!" Baba scolded Anuj.

Anuj stood with his head down, looking at the floor. No option: his father on one side, his friends on the other. (Har ek dost kamina hota hai.)
Every friend is a scoundrel.

"Go inside now, and study." The three filed into Anuj's room one behind the other.

THE STUDY BEGINS

As soon as they were in the room, Anuj started again. "Abe, why push it on me? You were late, and I got the scolding!"

"Who was in such a hurry to eat the samosa downstairs? You could have eaten it up here." Once again Sameer shut Anuj up. Everyone knew that when Sameer spoke, the other person went quiet, and why his friends kept testing the poison anyway remains a mystery.

Anuj changed the subject. "Chalo, now we'll study History."

"History? Or Goregraphy? What are you planning to do?" asked Sameer.

"Not me. We."

On hearing we, Chetan and Sameer went khi khi khi in unison.

"Arre andya, are you mad? If I wanted to study, wouldn't I have sat at home, jadya?" Chetan explained, with reference to context. "My uncle and aunt are arriving tonight, late, around two. Until they come, everyone at home will stay awake, and I'd have to sit reading something. This plan was to escape that. I came here to get a good night's sleep, and you're saying let's do History!"

Sameer added, "I haven't slept properly for two days either. Last night, Thursday, I did a jaagran for the two o'clock picture. How late are you planning to study?"

"I was thinking we'd study till five in the morning!"

This answer convinced Chetan and Sameer that the knock on the head earlier had gone very deep. They looked at the clock. It was ten, and this patthya planned to stay up till five!

Seeing his ambition, Samya actually wanted to laugh, but to pull Anuj's leg some more he said, "Do one thing, Anuj. When you go to sleep at dawn, wake me up, then I'll study."

Chetan didn't want anything to do with studying, not even in a joke. Instead of joining Samya, he pulled up a blanket and settled down to sleep. Samya quickly pulled up his blanket too and added one more, "Look, Anuj, wake me, but not before five, okay? You're sure you'll stay up till five? Otherwise I'll set an alarm."

But Anuj had gone beyond jokes. His resolve was firm: tonight, by studying History, he would make history.

Night in a bedroom: a boy sits at a study table under a desk lamp, head propped on one hand, eyes drooping over a thick open book, while two friends sleep in the beds behind him, one snoring; the wall clock shows ten o'clock.
10 p.m. History is about to be made.

REVENGE

Ten became eleven. The two sleeping kaarti (rascals) were now snoring loudly. There was a rhythm even in their snoring, and Anuj began to sway to it. Swaying, he would read ten or fifteen lines, then lose track of what he was reading. Ten lines back, five forward... and in the next four hours he read a whole four pages! The chapter had ten more.

This was going nowhere, so Anuj began making room to sleep.

But the sight of the two peaceful, contented faces irritated him. It was their snoring that had stopped him from studying. It was because of them that he had been scolded by Baba. And look at them sleeping now! These thoughts woke up a brain that had been on the verge of sleep, and the mischief inside came alive. The clock said two. And earlier Samya had kept taunting him: wake me at five, at five!

..."Revenge!" Tube petli: the tube light came on.

Anuj was now on a different mission. He fetched a stool from the balcony and turned the wall clock from two to five. Sameer's and Chetan's watches were lying on the table; he turned their hands too.

Then he began the chant: "Sameer, get up, Sameer, get up!" Meanwhile he was deliberately shaking Chetan. Both opened their eyes, no idea what was happening. Anuj stayed in character: "Abe, get up, get up, it's five o'clock! You're the ones who said you wanted to study. Get up!"

Chetan ignored him and turned over, but Anuj didn't stop until both were sitting up. Once he was sure their sleep was properly ruined, Anuj pulled up the blanket and went to sleep himself.

CHAPTER 14

Did I say anything about waking me at dawn before I slept? Half-asleep, Chetan couldn't work it out.

Sameer was a little confused too. His bed was pushed right up against the table, so when he sat up, the table and its books were right in front of him. Instinctively he picked up one of the books.

Arre! He's actually started studying! Chetan couldn't make sense of anything. Still, since he was up, he might as well go to the bathroom.

Sameer, meanwhile, looked at the book the way a small child looks at something new. Big size, foolscap: must be a workbook. But this one was filled in! Every workbook so far had been empty, and stayed empty. Big books were either Drawing or Geography. Anuj's elder brother's? No. Anuj could spill tea or water at any moment, and his brother would never risk leaving his books on Anuj's table.

Decided, then: this was the Geography book!

In parallel, Chetan's half-asleep experiments were under way in the bathroom. How do you get water out of this tap? This andya and his lai hauss for fancy fittings! Why not a normal round tap, what's this lever? Pulled it: no water. What's this button? Let's pull it... and, just like in the movies, the shower came on, straight onto Chetan's head!

Sleep vanished. He escaped mostly dry: some of his shirt, his face and his feet got wet, but the main thing was that his pants had stayed dry!

Split scene: on the left a sleepy boy sits up in bed staring wide-eyed at a large book held in both hands; on the right, through a doorway, another boy jumps in alarm as a shower sprays over his head, clutching his trousers to keep them dry.
Parallel-ly: one boy discovers a book, the other discovers a shower.

TAAP TAAP TAAP

Chetan's crisis was over. Sameer still wasn't sure this was the Geography book. Anuj was in deep sleep. All was quiet again.

Then, in the silent night, came the sound they use as background in Hindi horror films: taap... taap... taap.

Someone was walking towards the room. Both boys were still half-asleep and didn't know what to do. Chetan stayed in the bathroom, listening, and Sameer was so absorbed in the mystery of the book that he probably didn't hear it at all.

Chetan hadn't locked the room on his way to the bathroom. One push, and Baba was in!

Right in front of him was Sameer, staring intently at a book, and the praise was instant: "Wah! The studying's going strong. Shabaash, boy! What are you studying, baala?"

A moustached father in spectacles, white vest, striped pyjama and wristwatch stands in the bedroom doorway pointing at a boy who is reading a book very seriously in bed by lamplight; a third boy is a lump under a flowered blanket, and a fourth face peeps out wide-eyed from the bathroom door.
“Shabaash, boy!” To the wrong boy.

"Geography," came the instant reply, with the usual confidence.

"What are you reading?"

With the same confidence: "Chapter fourteen!"

Hearing chapter fourteen in the bathroom, Chetan panicked. Wanting to get out before anything worse happened, he hurriedly wiped his face, hands and feet, came out, and entered the room right behind Baba. Baba got a bit of a shock. All this while he had assumed it was Anuj in the bathroom, and out came Chetan!

"Where is Anuj?"

Like actors in a Marathi serial, in full slow motion and full drama, Sameer and Chetan turned their heads towards the blanket. Despite the silence of the night, it felt as if the serial's dhishh... dhishh... dhishh was playing.

Sameer said, calmly and innocently, "Anuj? He... is sleeping."

The fire went from the soles of Baba's feet to his head. He looked at Chetan and, controlling his tone a little, asked, "Where were you?"

However sleepy Chetan might be, he always knew when there was a fire, and how to save himself from it. If he said I just woke up, the fire would come his way. So, wiping his face with style, he said, "I was starting to feel sleepy, so I went to wash my face and wake myself up. We have to finish Geography tonight, no?"

This answer was the incense stick touching a little red tilak to the wick of a sutli bomb. Chetan lit the wick and walked away from the bomb. He went and stood next to Sameer and, for no reason, picked up a book.

The explosion was coming, and it came. "ANUJ, GET UP!" So loud that every Anuj, Aniket and Anivesh in the society, everyone with an A and an N in their name, must have woken up!

Anuj shot up and was on his feet in one motion. In front of him, a furious Baba; beside him, Sameer and Chetan with a book each. Chetan was holding his upside down.

Baba said nothing more. He turned, went to the hall and sat down.

THE HEARING IN THE HALL

Nothing had been said, but the party understood they had to follow. Sameer behind Anuj, Chetan behind Sameer. Anuj went and stood alone in front of Baba; Chetan stopped at the hall door, holding on to it, and pulled Sameer close. Anuj didn't know what had happened, but if Baba had shouted, he had messed up somewhere. He stood with his head bowed.

"What is going on? Look at Sameer. He can't study at his own house, so he comes here to study, and you're sleeping! Have you no shame at all?"

"But Baba, I only just slept. They were sleeping, I was studying alone," the accused began to plead.

"Then what did I see? I always thought Chetan was a relaxed sort. Even he is washing his face to stay awake, and you're sleeping! Going to study all night, he says!" All this while Baba's finger was pointing at Chetan. Anuj, too, turned to look at Chetan in astonishment. He was washing his face to study?!

Hiding at a distance, Chetan couldn't hear properly, and wondered why Anuj and Baba were looking at him. In a low voice he asked Sameer, "Are they talking about us or Anuj? They're talking really loudly. Ey Samya, was he just saying my name?"

Sameer, though, was listening intently. He knew the fire could turn towards them at any moment, and he had brought the book along as a fire extinguisher. But who would fall into the fire, him or his friend? Obviously, if it came to that, the friend would have to be pushed. And the more Chetan stayed in the dark, the easier he would be to push. So Sameer ignored all of Chetan's questions.

Looking at his own wristwatch, Baba asked, "It's half past two now. When did you sleep?"

In the living room at night, under a wall clock showing half past two, the angry father points at a boy who stands with his head bowed; behind them a second boy hugs a book to his chest with a calm little smile and a third peeps round the door frame.
The hall clock says 2:30. So does Baba's watch. Anuj's room had a different opinion.

"Just now, at two-twenty. I woke them up and then slept," Anuj began his defence.

Baba looked at Sameer. Among the three, Sameer's stock had risen. Anuj's was already down and was now negative. Sameer, the book in his hand, his sincere face: Shravan Bal himself!

"Sameer, tell me the truth, baala. Don't lie because he's your friend. Was he studying or not?"

Behind Sameer, Chetan was in a different panic altogether. How is it two-thirty? We woke up at five! My watch said quarter past five. Either we've time-travelled, or I'm dreaming.

But Sameer was calm as usual, what they call stoic in English. Under pressure, his head worked. He looked at the clock in the hall: two-thirty. Baba's wristwatch: two-thirty. So how had the wall clock in Anuj's room said five? He looked at Anuj; Anuj looked at him. In that instant Sameer understood: Anuj had done some kide. Mischief, in plain English.

"Really, Baba, I was studying," Anuj said again.

"Oh really? What did you study?"

"History."

Baba turned to Chetan. "Chetan, what were you studying? And Sameer, don't you dare answer."

Chetan had worked out that Sameer's side was the heavier one. Anuj or Sameer, History or Geography, and Chetan gave the correct answer: "Geography!"

"How far did you get?"

"Chapter fourteen!!"

Anuj couldn't follow. Where did Geography get a fourteenth chapter? "Abe, what nonsense..."

The abe from Anuj's mouth went straight to Baba's head. "Anuj! Is that any way to speak? First you lie, and now this cheek?"

Baba stood up and put the final question to Sameer and Chetan: "Tell me the truth. Was he studying with you or not? When did he sleep?"

In a stoic, perfectly calm voice, Sameer replied, "He slept two and a half hours ago."

Chetan nodded too. In perfect sync, the two took one step back, to give Baba room to swing.

SANNN!

Hearing the sound, Anuj's mother came into the hall. Baba explained the whole affair in ten seconds flat. Again: SANNN!

Baba turned to Sameer. "Arre baala, you two go to the room. Anuj will come in a while."

HALF PAST FIVE

Nodding, the two shahani baala, good little boys, went to the room, shut the door and shook with laughter, keeping as tight a lid on the khi khi khi as they could manage.

A full ten minutes later, a red-faced Anuj came in. "Abe, two and a half hours ago? Have you no shame?"

Sameer replied at once, "You're the one who said you slept at two-twenty." Pointing at the wall clock: "Look at the time: half past five. That's nearly three hours, isn't it? We even said half an hour less."

Chetan sat there grinning and nodding.

Anuj went to the balcony, fetched the stool, turned the wall clock's hands back again, climbed down, and sat in front of Sameer.

Chetan and Sameer patted his shoulder. "Let it go now, Anuj," said Sameer. "Come on, let's do chapter fourteen now!"

The three friends laughed till their stomachs hurt.

Back in the bedroom by lamplight, three boys sit up in bed: one points cheerfully at the wall clock, which shows half past five, the boy in the middle rests his chin on his hand looking put out, and the third laughs with his eyes shut.
“Look at the time: half past five.”

Anuj may have laughed a little less than the other two that night, with his cheeks still stinging. But even today, whenever that night's study comes up, he laughs until there are tears in his eyes.

Three grown men laugh around a table covered in old photographs, tea and a plate of samosas; behind them, like memories pinned to the wall, are sketches of that night: the boy on the stool at the clock, the book, the shower, the father in the doorway and the three boys in bed.
Today, whenever that night comes up.

— Vinaay Patil

Today's Lesson

The formula for combined study

  • Boys asleep2
  • Boys studying1
  • Clocks moved1 (twice)
  • Chapters in the book12
  • Chapter quoted14
  • The one who studied gotSannn ×2
Har ek dost kamina hota hai

Days Under the Crescent Sun

Stories from school days and a 1990s Pune childhood: plans that were too clever, teachers who were never questioned, and the people who made it all bearable.

More from the series →