ऐकलेल्या गोष्टीHostel Hearsay·गोष्ट २१ / ३Story 21 of 3·पुणे · हॉस्टेलPune · Hostel
ऐकलेला बस डेपोThe Bus Depot We Heard About
English: The Bus Depot We Heard Aboutमराठी: ऐकलेला बस डेपो
एक पेपर, बसच्या शिक्क्यांवरचा एक भव्य सिद्धांत, आणि मंगूचा एक प्रश्नOne newspaper, one grand theory about bus stamps, and one question from Mangu
मार्केटयार्डला स्वतःचा बस डेपो होणार होता. आपण कधीच हरवणार नाही याची पूर्ण योजना बंड्याने तयार ठेवली होती. मग मंगू आत आला.Market Yard was getting its own bus depot. Bandya had already worked out how this would stop us ever getting lost. Then Mangu walked in.
By Vinaay Patil२ मिनिटे वाचन2 min read
मूळ गोष्ट मराठीत. English version साठी बटण दाबा.Originally written in Marathi. Switch for either version.
मुखपृष्ठCoverबसच्या मागचा शिक्का. बंड्याचं लेक्चर चालू.The stamp on the back of the bus. Bandya’s lecture is in progress.
हजेरी · रूम १० × १२Roll call · Room 10 × 12
तिन्ही गोष्टींमधली तीच पलटण. या गोष्टीत हजर असलेले ठळक.The same platoon in all three stories. Those present in this one are inked in.
रताळ्याRatalyaसोपानSopanझोपेत “ॲग्री”“agrees” in his sleepगैरहजरAbsent
वाटाण्याVatanyaनवीनNavinइंजेक्शनला घाबरतोafraid of injectionsगैरहजरAbsent
गणूGanu(नाव गुप्त)(name withheld)चादर आणि शहाणपणाbedsheet and wisdom
नान्याNanyaनरेश · नानूNaresh · Nanuपाणी भरणाराfills the waterगैरहजरAbsent
०१
०१ · एक नंबर बातमी
रविवारची सकाळ. बंड्या पेपर वाचता वाचता गणूकडे वळला आणि चालू झाला, “काय गण्या, एक नंबर बातमी आहे बघ आज.”
गणूला आतापर्यंत बंडोपंत साहेबांची चांगली ओळख झाली होती, त्यामुळे जास्त कुतूहल न दाखवता त्याने निवांतपणे विचारलं, “काय बातमी आहे?”
बंडूला आपला ऑडियन्स मिळाला. हो जा शुरू! “तुला माहिती आहे का, आपल्या मार्केटयार्डला नवीन बस डेपो होणार आहे!”
गणू, “म्हणजे आता बसेस वाढणार, आपल्याला सोयीचं होणार!”
पण गणूला माहीत होतं की बंडोपंत काही एवढ्यावर थांबणार नव्हते. त्यामुळे त्याने रूमवर नुकत्याच शिरलेल्या मंगूसमोर टाळीसाठी हात पुढे केला.
सवयीप्रमाणे बंडू चालू राहिला, “गणूशेठ, कधीतरी लांबचा विचार करा! अहो, आता आपल्याकडे बस डेपो होणार. आत्तापर्यंत आपण ज्या बसमध्ये बसून इकडे येतो, त्याच्या मागे काय लिहिलेलं असतं, शिक्का कसला असतो, माहिती आहे का?”
०२
०२ · डेपोचा शिक्का
गणू, “नाही,” थोडा चेहरा पाडून बोलला. ‘As expected’, आता आपल्या वाट्याला बोधकारक वाक्यं येणार, याची तयारी होती ती.
बंडू, “आपण सुशिक्षित आहोत, याचा उपयोग करून घेत जा. वाचा, लक्षात ठेवा. GK काही असतं का नाही!! असू दे. तर, प्रत्येक बसमागे त्या बसच्या डेपोचा शिक्का असतो. सध्या आपल्याकडे डेपो नाही, तर शिक्का ‘स्वारगेट’ असा असतो. डेपो झाला की शिक्का ‘मार्केटयार्ड’ येणार. म्हणजे एखादी बस मार्केटयार्डची आहे का नाही, ते आपल्याला बसच्या मागच्या शिक्क्याने कळणार!
आपण कुठे हरवलो असलो, तर शिक्का दिसला की लागायचं पेडल मारायला. फॉलो करा आणि न चुकता back to pavilion व्हा!”
०३
०३ · कोडक मोव्हमेन्ट
आता नुसता गणू असता तर ही बात हजम पण झाली असती. पण मंगूची ट्यूब पेटली,
“पण मागून कळणार कसं, बस मार्केटवरून आली आहे की मार्केटकडे चालली आहे?”
त्या वेळी बंडोपंतांचा झालेला चेहरा: त्याला पुणेरी भाषेत “कोडक मोव्हमेन्ट” म्हणतात.
चित्र १कोडक मोव्हमेन्ट. मागे मंगू: इकडे की तिकडे?
समाप्तशिक्का: मार्केटयार्ड. दिशा: नमूद नाही.
01
01 · FRONT-PAGE NEWS
Sunday morning. Bandya, reading the paper, turned to Ganu and switched on. “Ganya, first-class news today. Look.”
By now Ganu knew Bandopant-saheb well, so he showed no particular curiosity and asked at leisure, “What news?”
Bandu had his audience. And… action! “Do you know, our Market Yard is getting a new bus depot!”
Ganu: “So more buses. Convenient for us.”
But Ganu knew Bandopant was never going to stop there, so he held out his palm for a high-five to Mangu, who had just walked into the room.
Bandu carried on, as was his habit. “Ganu-sheth, think long-term for once! We are getting a bus depot. All this while, the buses we ride here, what is written on the back? What stamp do they carry? Do you know?”
02
02 · THE DEPOT STAMP
“No,” said Ganu, with a slightly fallen face. As expected. A round of improving sentences was headed his way, and he had braced for it.
Bandu: “We are educated people. Put it to use. Read. Remember. GK, does it exist or not!! Never mind. So. Every bus carries the stamp of its depot on the back. We have no depot now, so the stamp says Swargate. Once the depot comes, the stamp will say Market Yard. Which means we can tell from the stamp on the back whether a bus belongs to Market Yard!
So if we're ever lost somewhere, the moment we see the stamp, start pedalling. Follow it, and without fail, back to the pavilion!”
03
03 · KODAK MOMENT
Had it been only Ganu, the theory might even have gone down. But Mangu's tube light came on.
“But from the back, how will you know if the bus is coming from Market Yard or going to it?”
The face Bandopant made at that moment is what, in Puneri, is called a “Kodak movement”.
Panel 1The “Kodak movement”. Behind it, Mangu: this way, or that way?
The EndStamp: Market Yard. Direction: not specified.
10 × 12
ऐकलेल्या गोष्टीHostel Hearsay
पुण्यातल्या हॉस्टेलची एक १० × १२ ची खोली: एक आरसा, पाणी नाही, आणि कोणी न बघितलेल्या पण सगळ्यांनी ऐकलेल्या गोष्टी.Sunday mornings in a 10 × 12 hostel room in Pune: one mirror, no water, and stories nobody saw but everybody heard.