ऐकलेल्या गोष्टीHostel Hearsay·गोष्ट २० / ३Story 20 of 3·पुणे · हॉस्टेलPune · Hostel
ऐकलेले प्रवचनThe Sermon Mangu Heard
English: The Sermon Mangu Heardमराठी: ऐकलेले प्रवचन
एक रविवार, एक कपाटभर पुस्तकं, आणि चार राज्यं जिंकून नाश्त्यापुढे हरलेला एक राजाOne Sunday, one cupboard of books, and a king who conquered four kingdoms and lost to breakfast
बंड्याने ठरवलं होतं, रविवार म्हणजे सेमिस्टरची पुस्तकं अरेंज करायचा दिवस. रूमने ठरवलं होतं, रविवार म्हणजे नाश्ता. मंगूने एका प्रवचनात ऐकलेल्या गोष्टीने तो वाद मिटवला.Bandya had decided Sunday was for arranging the semester’s books. The room had decided Sunday was for breakfast. Mangu settled it with a story he once heard at a pravachan.
By Vinaay Patil४ मिनिटे वाचन4 min read
मूळ गोष्ट मराठीत. English version साठी बटण दाबा.Originally written in Marathi. Switch for either version.
मुखपृष्ठCoverमंगू उवाच. बाकीचे ऐकताहेत, बंड्या पुस्तकांच्या मनोऱ्यात.Thus spake Mangu. The rest listen; Bandya stands among towers of books.
हजेरी · रूम १० × १२Roll call · Room 10 × 12
तिन्ही गोष्टींमधली तीच पलटण. या गोष्टीत हजर असलेले ठळक.The same platoon in all three stories. Those present in this one are inked in.
रताळ्याRatalyaसोपानSopanझोपेत “ॲग्री”“agrees” in his sleep
वाटाण्याVatanyaनवीनNavinइंजेक्शनला घाबरतोafraid of injections
गणूGanu(नाव गुप्त)(name withheld)चादर आणि शहाणपणाbedsheet and wisdom
नान्याNanyaनरेश · नानूNaresh · Nanuपाणी भरणाराfills the waterगैरहजरAbsent
०१
०१ · प्राधान्यक्रम
नेहमीप्रमाणे रविवार सकाळ (साधारण ११:४५). आळस आवरत चंपक उठला. तोंड धुवत त्याची नजर बंड्याकडे गेली. बंडोपंत कपबोर्डमधली पुस्तकं आवरून ठेवत होते.
चंपकने माफक प्रश्न विचारला, “काय बंड्या, काय करतोय? चला, जरा नाश्तापाणीच बघूयात?”
बंड्याने आपल्या नेहमीच्या पुढारी भाषेत उत्तर दिलं, “अहो चंपकराव, कधीतरी खाण्यापिण्याच्या पुढे बघा. इथे या सेमिस्टरची पुस्तकं शोधून अरेंज करून ठेवतोय, म्हणजे आपल्याला परीक्षेला… महत्त्वाचं आहे… तर जरा तुम्ही तुमच्या पोटाला सांगा, थांब म्हणून.”
तितक्यात गणू उठला होता. चंपकचा प्रश्न आणि त्याला मिळालेलं उत्तर, दोन्हींचा बोध घेत गणूने चादर तोंडावर ओढली. अजून २ तास तरी नाश्ता नशिबात नाही, तर निदान झोपून घ्यावं. कारण दोन आठवड्यांपूर्वी श्री बंडोपंत यांचा गाद्या झटकून परत ठेवण्याचा कार्यक्रम ३ तास चालला होता, आणि इथे तर पुस्तकं वाचून अरेंज होत होती. निदान ३-४ तास चालणार हे नक्की!
राजा पण गणूचा शहाणपणा अंगी घेऊन चादर ओढू लागला.
चित्र १बंड्याचा कार्यक्रम सुरू, चंपकचं पोट तक्रारीत, आणि मागे दोन चादरी शहाणपणाच्या.
तितक्यात ग्रुपचे ‘चावरे’ म्हणून ओळखले जाणारे श्री मंगू उठले. झालेलं संभाषण त्यांच्या कानावर पडलं होतं आणि त्यांची ट्यूब पेटली, “बरोबर आहे बंड्या. ते exam च्या वेळी नेहमी पुस्तकांचा गोंधळ होतो. बरं झालं, तू आवरून घे. तोपर्यंत मी तुला एक गोष्ट सांगतो, एका प्रवचनात ऐकली होती मी.”
चंपक, “पोहे, शेंगदाणे… जाऊ दे, सांग.”
बंड्या, “वा! प्रवचनाला जाता म्हणजे तुम्ही! वाटलं नव्हतं. बोला…”
०२
०२ · उवाच
मंगू बोलू लागला,
“एक धर्मवीर म्हणून राजा होता. हुशार, धाडसी, आणि महत्त्वाचं म्हणजे तो महत्त्वाकांक्षी होता. आपल्या बंड्यासारखा (हरभऱ्याचं झाड!).
त्याची एक महत्त्वाकांक्षा होती: आजूबाजूची ५ राज्यं जिंकून आपल्या राज्यात सामील करायची. त्याने एक मोठं सैन्य उभं केलं आणि पराक्रम गाजवत एकामागोमाग एक अशी चार राज्यं काबीज केली. त्याची नजर आता राहिलेल्या पाचव्या, रितनगर राज्यावर होती. रितनगरचं सैन्य कमजोर होतं, आणि शेवटी जिंकायला सोपं असं ते राज्य धर्मवीरने मुद्दाम ठेवलं होतं. कारण त्याला एका ऋषिमुनींनी सांगितलं होतं की आधी अवघड कामं करावीत, मग सोपी.”
“बरोबर आहे, चांगली शिकवण आहे,” बंड्याने interrupt केलं.
इग्नोर करत मंगू continue करू लागला,
“सोपं राज्य म्हणून राजा माफक सैन्य घेऊन निघाला. जास्त घोडे, रथ नेणं टाळलं. त्याला लवकर पोहोचून आपली मंजिल साध्य करायची होती. जास्त ओझं नको, लवकर पोहोचू, असा विचार करून तो निघाला. रितनगर त्याच्या हिशोबाने ३ दिवसांची मोहीम, अशी त्याची तयारी. पण रस्त्यात पिरू नदीला पूर आला होता आणि त्याचे दोन दिवस पाणी कमी होण्याची वाट बघण्यात गेले. पाणी उतरलं आणि राजाने नदी क्रॉस करून मोहीम रिझ्यूम केली. रितनगरच्या सीमेवर पोहोचल्यावर राजाला त्याच्या सेनापतीकडून कळलं की बरोबर आणलेली सगळी अन्नसामग्री संपली आहे. दोन दिवस जास्त लागल्याने आणलेलं सर्व अन्न संपलं होतं. संध्याकाळची वेळ होती, त्यामुळे रात्री तर युद्ध करणं शक्य नव्हतं. पण उद्या उपाशीपोटी सैन्य न्यायचं!”
चित्र २धर्मवीर, पिरू नदी, आणि हिशोबात नसलेले दोन दिवस.
इतक्यात सगळे झोपलेले, सस्पेन्समुळे जागे होऊन बसले होते. नीट लक्ष देऊ लागले.
मंगू आता फॉर्ममध्ये आला होता.
चित्र ३सीमेवर संध्याकाळ: रिकामी पोती, रिकाम्या वाट्या, आणि उद्याचं युद्ध.०३
०३ · जो जेवण देईल त्याला अभय आहे
“त्या रात्री रितनगरच्या बाहेर सीमेवरील एका गावात सैन्य घुसलं. राजाला खूप भूक लागली होती. त्याने आपल्या सैनिकांना धाडलं, ‘जा, गावातल्या एका घरातून जेवण घेऊन या. त्या घराला मोबदल्यात युद्धामध्ये अभय देऊ असं सांगा. त्यांचं घर नष्ट करणार नाही, हा शब्द द्या.’
सैनिक निघाले. त्यांना एक लहानसं घर दिसलं. राजाची ऑफर त्यांनी तिथल्या एका बाईला सांगितली, ‘मावशी, तुझं घर युद्धात नीट राहील, हा वादा.’
हे ऐकून मावशी म्हणाली, ‘थांबा, मी आत जाऊन ताट भरून ठेवते. बोलवा तुमच्या राजाला.’ सैनिक गेले आणि राजाला घेऊन आले. राजा घोड्यावरून उतरला. त्याचा आवाज ऐकताच मावशी एक ताट घेऊन बाहेर आली. पण त्या ताटात जेवण नव्हतं. त्यात तिने घरातलं सोनं, काही मोती, तिच्या बांगड्या, चांदीची नाणी ठेवली होती.
चित्र ४सोने चांदी आणि हिरे, घ्या ताटात
‘हे काय आहे?’ राजा दणाणला.
‘धर्मवीर राजा, तू तुझं राज्य सोडून एवढ्या लांब का आलास? या सोन्यासाठीच ना? उद्या तू युद्ध करणार कशासाठी? मोती, संपत्ती वाढवावी म्हणूनच ना? मग तेच मी तुला आज देते, ज्याची तुला हाव आहे,’ मावशी बोलली.
हे ऐकून राजा थक्क झाला. आपण कशासाठी युद्ध करतोय, हा प्रश्न त्याला पडला. दुसऱ्या दिवशी तो आपलं सैन्य घेऊन परत आपल्या घरी गेला.”
०४
०४ · तात्पर्य
“तात्पर्य काय? जास्त हाव करू नये. Greed is not good,” बंड्या बोलला.
मंगू म्हणाला, “नाही. एवढ्या लांब गेला राजा, तो का परतला? कारण त्याला भूक आवरेना. त्याला कळलं, त्याला अन्न लागतं! म्हणून म्हणतो बंडोपंत, आमच्या पोटाला पण जरा अन्न मिळू द्या. धर्मवीरला कळलं, आता तुम्ही समजून घ्या. आमच्या पोटाचं बघा!”
हे वाक्य ऐकताच पूर्ण रूमला हसू सुटलं. खी खी खी खी खी.
बंडूने पुस्तकं बाजूला ठेवली आणि म्हणाला, “चला, आजचे पोहे माझ्याकडून.”
चित्र ५तात्पर्य मंजूर. पुस्तकं बाजूला, पाकीट पुढे, पोहे मधोमध.
समाप्तआणि पोहे बंड्याकडून.
01
01 · PRIORITIES
Sunday morning, as usual (roughly 11:45). Champak shook off his sleep and got up. Brushing his teeth, he noticed Bandya. Bandopant was clearing out the cupboard and arranging books.
Champak asked a modest question. “What's this, Bandya? Shall we look into some breakfast?”
Bandya replied in his usual politician's register. “Champak-rao, look beyond eating and drinking once in a while. I am locating this semester's books and arranging them, which is to say, for the exams… it's important… so kindly ask your stomach to wait.”
Ganu had woken up by then. He took in the question and the answer, drew the bedsheet over his face, and concluded that breakfast was at least two hours away, so he might as well sleep. Two weeks earlier, Shri Bandopant's programme of beating the mattresses and putting them back had run for three hours. Today the books were being read while being arranged. Three to four hours, minimum.
Raja borrowed Ganu's wisdom and pulled up his own sheet.
Panel 1Bandya’s programme under way, Champak’s stomach in protest, and behind them, two bedsheets of wisdom.
Then Shri Mangu woke up, known to the group as the one who bites. He had heard the whole exchange, and the tube light flickered on. “Quite right, Bandya. The books always get mixed up at exam time. Good that you're sorting them. Meanwhile, let me tell you a story. I heard it at a pravachan.”
Champak: “Poha, peanuts… never mind. Tell.”
Bandya: “Wah! So you attend sermons! Never would have guessed. Go on.”
02
02 · THUS SPAKE MANGU
Mangu began.
“There was a king called Dharmaveer. Clever, brave, and above all ambitious. Like our Bandya.” (Bandya visibly grew two inches.)
“His ambition was to conquer the five kingdoms around him and make them his own. He raised a great army and, one glorious campaign after another, took four of them. Now his eyes were on the fifth, Ritnagar. Ritnagar's army was weak; Dharmaveer had saved it for last on purpose, because a sage had once told him: do the hard things first, then the easy ones.”
“Correct. Very good teaching,” Bandya interrupted.
Mangu ignored him and continued.
“Since it was the easy one, the king set out with a modest army. He left behind most of the horses and chariots. He wanted to get there fast and finish the job; less baggage, quicker march. By his reckoning Ritnagar was a three-day campaign, and he packed for three days. But on the way the river Piru was in flood, and two days went in waiting for the water to go down. When it did, he crossed and resumed the campaign. At the Ritnagar border his general reported that the provisions were finished. The extra two days had eaten them. It was evening; no one fights at night. But tomorrow the army would march into battle on empty stomachs!”
Panel 2Dharmaveer, the river Piru, and two days nobody had packed for.
By now everyone who had been asleep was sitting up, hooked on the suspense, listening properly.
Mangu was in form.
Panel 3Evening at the border: empty sacks, empty bowls, and a battle in the morning.03
03 · SAFETY FOR WHOEVER FEEDS US
“That night the army entered a village on the border, just outside Ritnagar. The king was very hungry. He sent his soldiers: ‘Go to any house in the village and bring me a meal. In return, tell them the house will be spared in the battle. Give them my word.’
The soldiers found a small house and made the offer to the woman there. ‘Mavshi, your house will come through the war untouched. Promise.’
She said, ‘Wait. I'll go in and fill a plate. Call your king.’ The soldiers fetched the king, and he got down from his horse. At the sound of his voice she came out with a thali. But there was no food on it. On it she had laid out the household's gold, some pearls, her own bangles, and silver coins.
Panel 4Gold, silver and diamonds: help yourself from the thali.
‘What is this?’ the king roared.
‘King Dharmaveer, why did you leave your kingdom and come all this way? For gold, isn't it? Why will you fight tomorrow? For more pearls, more wealth. So I am giving you today exactly what you hunger for.’
The king was stunned. For the first time he asked himself what he was fighting for. The next morning he took his army and went home.”
04
04 · THE MORAL
“So the moral is: don't be greedy. Greed is not good,” said Bandya.
“No,” said Mangu. “Why did the king turn back after coming all that way? Because he couldn't take the hunger any more. He understood that he needs food! So I say to you, Bandopant: let our stomachs have a little food too. Dharmaveer understood. Now you understand. Look after our stomachs!”
The whole room burst out laughing. Khi khi khi khi khi.
Bandu put the books aside and said, “Come on. Today's poha is on me.”
Panel 5Moral accepted. Books aside, wallet out, poha in the middle.
The EndAnd the poha was on Bandya.
10 × 12
ऐकलेल्या गोष्टीHostel Hearsay
पुण्यातल्या हॉस्टेलची एक १० × १२ ची खोली: एक आरसा, पाणी नाही, आणि कोणी न बघितलेल्या पण सगळ्यांनी ऐकलेल्या गोष्टी.Sunday mornings in a 10 × 12 hostel room in Pune: one mirror, no water, and stories nobody saw but everybody heard.